ज्ञानगंगा अभयारण्याच्या बाह्यभागात अस्वलांचे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:01 IST2018-10-05T18:00:44+5:302018-10-05T18:01:07+5:30
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्ञानगंगा अभयारण्याच्या बाह्यभागात अस्वलांचे हल्ले
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे. चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ज्ञानगंगा अभयारण्य वसले असून अलिकडील काळात बुलडाणा रेंजमध्ये प्रामुख्याने अस्वलांचे हल्ले झाल्याचे समोर आले आहे. जंगलांची घटती घनता, मानवाचा जंगलामध्ये वाढता हस्तक्षेप ही प्रमुख कारणे हा संघर्ष होण्याच्या मागे असल्याचे एकंदरीत पाहणीत समोर येत आहे. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्यालगत बफर झोन फारसा नसल्याने अस्वलांचे थेट शेतकर्यांच्या शेतात ये-जा होत आहे. त्यातून हा संघर्ष होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. अलिकडील काळात अस्वलांचे झालेले हल्ले हे जंगलांच्या जवळच्या परिसरात झालेले असले तरी अमडापूर सारख्या भागात अस्वलाकडून झालेला हल्ला हा काहीसा अनपेक्षीत आहे. संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये मानवचा थेट जंगलात होत असलेला प्रवेश, जमीन व नागरिकांच्या वसत्या या वनला लागून आहेत, जंगलामध्ये पशुधन चराईचे वाढलेले प्रमाण आणि वसत्यांलगत असलेल्या भागात अस्वलांच्या खाद्याचे अधिक प्रमाण ही कारणे मानव व अस्वलांच्या संघर्षास कारणीभूत ठरत असल्याचे जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयास दिलेल्या अहवालात या संस्थेने म्हंटले आहे.
अस्वलांचा आवडतात बोरं
या संस्थेने केलेल्या पाहणीत अस्वलांना बोरं फार अवडत असल्याचे समोर आले आहे. सुमारे दोन हजार २०० हेक्टवर बुलडाणा,खामगाव,मोताळा आणि चिखली तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या पट्ट्यातील शेतीत धुर्यावर बोरीची झाडे आहेत. त्यांची प्रॉडाक्टीव्हीटीही चांगली असल्याने अस्वल या भागात आकर्षीत होत असल्याचा संस्थेचा अंदाज असल्याचे जिल्हा उपवनसंरक्षक सुरेश वढाई यांनी सांगितले.