साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:07 PM2020-02-26T14:07:32+5:302020-02-26T14:07:38+5:30

शासनाच्या दिरंगाईमुळे सिसीआय केंद्रावरच शेतकºयांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते.

Barriers to buying cotton due to lack of storage space | साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे

googlenewsNext

योगेश फरपट / मनोज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना अडचण जावू नये म्हणून शासनाने सीसीआय केंद्र सुरु केले. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिसीआय केंद्रावरच शेतकºयांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर, चिखली या ठिकाणी सीसीआय केंद्र सुरु करण्यात आले. पाऊस चांगला झाल्याने सर्वत्रच कापसाचे उत्पादनही चांगले झाले. आॅक्टोबर महिन्यापासून याठिकाणी कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र दोन महिन्यातच सीसीआय केंद्रावर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा कापूस छुप्या मार्गाने विकल्या जावू लागला. यामुळे मलकापूरसह इतर केंद्रावर शेतकºयांनी तिव्र रोष व्यक्त केला. आतातर कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी जास्त झाल्याने, सरकी पडून असल्याने व गठाण साठवणूक की करीता जागा नसल्याच्या कारणास्तव १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत दिवस शासकीय कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान कापूस खरेदी केंद्र बंद होती काय अशी अनेकांना भिती लागली आहे. कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक वाढली असून दररोज या शासकीय कापूस खरेदी केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाहनातून शासकीय खरेदी केंद्रांवर विक्री केला जाणारा कापूस हा व्यापा?्यांचा असून तो मात्र शेतक?्यांच्या नावावर दिवसाढवळ्या विक्री केल्या जात आहे. ही बाब सर्वश्रुत असूनही संबंधित यंत्रणा या बाबीकडे अगदी प्रारंभी पासूनच कानाडोळा करीत आहे हे विशेष!


मलकापूर सीसीआय केंद्रावर वाहनांच्या रांगा
मलकापूर: शासकीय तर दोन खासगी कापूस केंद्रांवर एकूण ३ लाख ७९ हजार ९१८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून सद्यस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दररोज शेकडो वाहनांच्या रांगा लागत आहे. शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या नावाने अर्थात कॉटन नगरी म्हणून मलकापूरची ओळख आहे त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक राहते. शहरात आज मितीस अमित फायबर, आ़शुतोष अ‍ॅग्रो, हरिओम जिनिंग, पॅनयाशियन जिनिंग, एनसीसी गणपती जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आदी पाच शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. तर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी मंजीत कॉटन व जनक जिनिंग या दोन जिनिंग मध्ये खाजगी कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआय अंतर्गत असलेल्या पाच शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर अद्यापपावेतो २ लाख ७० हजार ९१८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तर खाजगी केंद्रांवर १ लाख ९ हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. खाजगी कापूस खरेदी केंद्रांवर सरासरी प्रति क्विंटल ४ हजार ९०० रुपये तर शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर ५ हजार ४४० रुपये सरासरी क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे.

Web Title: Barriers to buying cotton due to lack of storage space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.