पिककर्ज पुर्नगठनासाठी बँकेवर मोर्चा

By Admin | Updated: July 10, 2014 01:32 IST2014-07-09T23:46:49+5:302014-07-10T01:32:55+5:30

खामगाव तालुक्यातील कास्तकारांचा बँकेवर मोर्चा

A bank on the bank for re-emergence of crop loan | पिककर्ज पुर्नगठनासाठी बँकेवर मोर्चा

पिककर्ज पुर्नगठनासाठी बँकेवर मोर्चा

खामगाव : अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याने टेंभुर्णा, पिंप्री गवळी, कोलोरी, जनुना, कुंबेफळ, भालेगाव, घाणेगाव, राहुड, चिंचपूर, जळका भडंग येथील शेतकर्‍यांना घेऊन शे तकरी स्वाभिमानी संघटनेने आज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर मोर्चा काढला.
गारपीटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकर्‍यांना तात्काळ मदत बचत खात्यात जमा करावी. आदी मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढून बँक प्रबंधक घनश्याम छंगाणी, डेपोटी मॅनेजर विनोद कस्तुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. या मोर्चात संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे, संजय इंगळे, तालुकाध्यक्ष आनंदा आटोळे, राजु नाकाडे सहभागी होते.

Web Title: A bank on the bank for re-emergence of crop loan