शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:54 AM

 अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.

ठळक मुद्देश्याम उमाळकर यांचा आरोप सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी व सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुसह पेट्रोल, डीझलचे भाव दररोज वाढत आहेत. नोटाबंदी, बाजारामध्ये पिकांना भाव नाही, शेतकर्‍यांना वेळेवर कर्जमाफी मिळाली नाही, नवीन पीककर्ज वेळेवर मिळाले  नाही. यांसह  अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.   पेट्रोल व डीझलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसच्यावतीने ५ फे ब्रुवारी रोजी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, यावेळी श्याम उमाळकर बोलत होते. या मोर्चात  लक्ष्मणराव घुमरे, नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अँड. अनंतराव वानखेडे, नंदकिशोर बोरे, नाजीम कुरेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, भुषणभय्या देशमुख, सुरेश मुंदडा, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, कलीम खान, वसंतराव देशमुख, शैलेश बावस्कर, वसीम कुरेशी, मो.अलीम मो.ताहेर, आश्रुजी काळे, चित्रांगण खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी विश्रामगृहापासून बैलगाडी मोर्चाला सुरुवात होऊन जानेफळ चौक, जिजाऊ चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये होऊन लक्ष्मणराव घुमरे, अँड.अनंतराव वानखेडे, आश्रुजी काळे, नंदकिशोर बोरे, वसंतराव देशमुख, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, देवानंद पवार आदींची भाषणे झाली. संचालन शैलेश बावस्कर यांनी तर आभार शहराध्यक्ष कलीम खान यांनी मानले. त्यानंतर नायब तहसीलदार मीरा पागोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये प्रदीप देशमुख, विनायक टाले, गबाजी गवई, यासीन कुरेशी, डॉ. भरत आल्हाट, अशोक उबाळे, गणेश बोचरे, बाळासाहेब वानखेडे, नामदेव राठोड, राजेंद्र गायकवाड, युनूस पटेल, शंकर सपकाळ, दिलीप बोरे, गणेश अक्कल, नीलेश मानवतकर, संदीप पांडव, आकाश जावळे, केशवराव देवकर, हुसेन गवळी, संदीप ढोरे, विनोद राठोड, वामन मोरे, अंकुश दाभाडे, शेख लतीफ, संजय सुळकर, युसूफ  पठाण, दिलीप खरात, तुकाराम खरात, विलास शेळके, कंवरसिंग चव्हाण, गजानन लोखंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.      

टॅग्स :Shyam Umalkarश्याम उमाळकरagitationआंदोलनcongressकाँग्रेस