शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

अवलियांच्या रुपाने घडते राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

By admin | Updated: November 6, 2014 23:20 IST

मेहकर तालुक्यातील मोळा येथे अवलिया यात्रा महोत्सव : उंट,घोड्यांच्या लवाजमात ‘संदल’.

ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा)हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक म्हणून केवळ तालुक्यातच नव्हे तर पश्‍चिम वर्‍हाडातील तीनही जिल्ह्यात संत अवलिया महाराजांची ख्याती आहे. तालुक्यातील मोळा येथे दरवर्षी कार्तिक पैर्णिमेला उंट, घोड्यांच्या लवाजमात अवलियांचा संदल निघतो; त्या दिवसापासून आठवडाभर चालणार्‍या अवलिया यात्रा माहोत्सवात पश्‍चिम वर्‍हाडातील सर्व धर्मियांचे लोक एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवितात. तालुक्यातील मोळा येथे सुमारे २५0 वर्षांपूर्वी संत अवलीया महाराजांचे आगमन झाले होते. सुरूवातीला खंडुजी पाचरणे हे त्यांचे शिष्य होते. संत अवलिया महराजांच्या कार्याने त्यांचे शिष्य वाढत गेले. दरवर्षी मोळा येथील त्यांच्या समाधी स्थळावर कार्तिक पैर्णिमेला संत अवलिया महाराजांचा यात्रा महोत्सव भरतो. हा यात्रा महोत्सव जवळपास १0 दिवस चाल तो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी उंट, घोड्यांच्या लवाजमात अवलियांचा संदल निघतो. तर दुसर्‍या दिवशी भाविकांना पुरी-भाजीचा महाप्रसाद वाटप केला जातो. या महा प्रसादाचा व संदलच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक येतात. संत अवलिया महाराजांच्या पादुका, चिमटा, कंदील, त्रिशुल भक्तांच्या दर्शनासाठी ठेवले जाते. *यात्रेतून पशूहत्या हद्दपारयात्रेच्या सुरूवातीच्या काळात मोठय़ा प्रमाणात पशु हत्या केली जायची. यात्रेमध्ये निष्पाप पशुंना आपले जीवन गमवावे लागायचे. त्यावर प.पू. दिलीपबाबा, सामूहिक विवाहाचे प्रणेते शिवाजीराव नवघरे यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पशुहत्या बंद करण्यात आली. आता गत दहा वर्षांपासून यात्रेत पशुहत्या बंद झाली असून, पुरी-भाजीचा नैवेद्य दाखविला जातो.