शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन

By admin | Updated: December 22, 2014 00:49 IST

हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार : रस्त्याच्या कामाचा तपशील जाहीर.

बुलडाणा : कोट्यवधी रूपये खर्च करूनही रस्त्याचे काम दज्रेदार न होणे, हा अनुभव तसा सार्वत्रिकच आहे. अवघ्या काही महिन्यात रस्ते खराब होतात आणि रस्त्यावरून येता-जाता शिव्यांची लाखोली सारेच वाहतात. प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू असताना, कामाचा दर्जा पाहण्याची तसदी कुणी घेत नाही. कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नागरिकांची नसली तरी, कर्तव्य नक्कीच आहे. कारण तो पैसा त्यांच्याच घामाचा असतो. म्हणूनच बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास कामांसदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असून, दर्जेदार कामासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.विधानसभा निवडणुकीत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी कमीशनराज संपवू आणि विकास कामे करताना ती दज्रेदार करू, असा विश्‍वास दिला होता. चिखली नाका ते धाड नाका या २ कि.मी. सर्कल रोडचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता दज्रेदार व चांगल्या प्रतीचा व्हावा, यासाठी आ. सपकाळ यांनी सोशल नेटवर्कींंगद्वारे लोकांना आवाहन केले आहे. रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार व्हावे, यासाठी नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता शेळके यांचा मोबाईल नंबर त्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय कामात पारदर्शकता असावी, यासाठी रस्त्याच्या संपूर्ण कामाचे विवरण सोशल साईटस्वर जाहीर केले आहे. रस्त्याच्या कामासाठी ८६ लाख ६२ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून ५0 एमएम गट्टीचा पहिला कोट, २0 एमएम गट्टीचा दुसरा कोट, त्यावर हॉटमिक्सचे डांबरीकरण, असे या कामाचे स्वरुप आहे. याशिवाय नागरीकांना या कामाबाबत काही अडचणी आल्यास संपर्क कार्यालयाचा आणि आ. सपकाळ यांनी स्वत:चा मोबाईल नंबर देवून संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. कामात पारदर्शकता आणण्यासाठी आ. सपकाळ यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सोशल नेटवर्कींंगच्या दुनियेत स्वागत होत आहे.