शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी व मंडळ अधिका-याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By admin | Updated: April 2, 2015 01:55 IST

लोणार तालुक्यातील प्रकार.

लोणार (जि. बुलडाणा) : वडिलोपार्जीत जमीन वाटणी पत्रकाद्वारे भावाच्या नावाने करून देण्यासाठी शेतकर्‍याकडून पैशाची मागणी करणारे मंडळ अधिकारी, तलाठी आणि इसम तिघेही लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. तालुक्यातील हिवराखंड येथील रवींद्र कुंडलीक कन्हारे वय २६ यांचे वडील कुंडलीक रोडूजी कन्हारे हे वयोवृद्ध असून, त्यांच्या नावावर हिवराखंड शिवारात शेत सर्व्हे क्र. ३५ मध्ये 0.२६ हे.आर. शेत सर्व्हे नं.१0६ मध्ये 0.४0 हे.आर., शेत सर्व्हे नं.६३ मध्ये 0.९४ हे.आर., शेत सर्व्हे नं.३४ मध्ये ७0 आर., शेत सर्व्हे नं.३७ मध्ये 0.३२ हे.आर. तसेच आई नर्मदाबाई कुंडलीक कन्हारे यांच्या नावावर शेत सर्व्हे नं.१0६ मध्ये ४0 आर, शेत सर्व्हे नं.३४ मध्ये 0.७0 आर. शेतजमीन आहे. आईवडील दोन्हीही वयोवृद्ध आहेत. यापैकी वडील कुंडलीक कन्हारे यांच्या नावावरील सर्व्हे नं.१0६ मधील 0.४0 आर आणि सर्व्हे नं.६३ मधील 0.९४ आर जमीन रवींद्र कन्हारे यांचे लहान भाऊ सुनील यांच्या नावे वाटणीपत्रकाद्वारे करून देण्यासाठी तलाठी एम.आर.राठोड यांनी रवींद्र यांना पाच हजार रुपये तर मंडळ अधिकारी नारायण राठोड यांनी ४ हजार रुपये तसेच खासगी इसम तुळशिराम यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत रवींद्र कन्हारे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरुन पोलीस अधीक्षक एस.एल.मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.बी.भाईक, पी.बी.खंडारे, सहा.पो. निरीक्षक भांगे, पोहेकाँ शेकोकार, पो.ना. गडाख, चोपडे, ठाकरे, शेळके, सोळंके, पोकॉं वारुळे, यादव, पो.ना.ढोकणे यांनी ३0 मार्च रोजी सायंकाळी तलाठी कार्यालय बिबी येथे बिबी येथे सापळा रचून पंचासमक्ष लाच मागणीबाबत पडताळणी केली. यावेळी मंडळ अधिकारी नारायण राठोड, तलाठी एम.आर.राठोड आणि खासगी इसम तुळशिराम या तिघांनी अनुक्रमे ४ हजार, ५ हजार आणि ३ हजार असे एकूण १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन १ एप्रिल रोजी मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य १ इसम या तिघांवरही लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली.