बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:26 IST2025-12-25T15:25:16+5:302025-12-25T15:26:12+5:30

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एका २१ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता गर्भवती होती, असल्याचेही समोर आले.

An outrageous incident in Buldhana! The in-laws tortured the 21-year-old pregnant newlywed so much that...; Where did the police catch the husband? | बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?

बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?

Buldhana Crime: सासरच्या लोकांचा मानसिक छळ असह्य झाल्याने एका २१ वर्षीय गर्भवती नवविवाहितेने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे मंगळवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पतीसह सासू व सासऱ्यांना अटक केली आहे. साधना विष्णू चोडकर (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

माळेगाव येथील साधना चोडकर हिचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. २३ डिसेंबर रोजी सकाळी तिने गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मृतक विवाहितेचे माहेर असलेल्या वाकदवाडी (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील नातेवाईक माळेगाव येथे दाखल झाले. 

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

सासरच्या लोकांकडून साधनाला सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पती, सासू व सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी सासरच्या लोकांना अटक केली. 

पती कुठे झाला होता फरार?

पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. सासू-सासऱ्यांना अटक केली, तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर हा फरार झाला होता. त्याला मोबाइल लोकेशनच्या मदतीने शोधले. त्याल अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. 

आरोपींना अटक झाल्याची खात्री पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाइकांना दिली. त्यानंतर दुपारी सुमारे ४ वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनीही माळेगाव येथे भेट दिली. 

कौटुंबिक अत्याचार सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद असून, माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : उत्पीड़न से तंग आकर गर्भवती महिला ने की आत्महत्या; पति गिरफ्तार।

Web Summary : मालेगांव में 21 वर्षीय गर्भवती महिला ने ससुराल वालों के उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। पुलिस ने उसके पति, सास और ससुर को गिरफ्तार कर लिया। पति अहिल्यानगर में मिला।

Web Title : Pregnant woman commits suicide due to harassment; husband arrested.

Web Summary : A 21-year-old pregnant woman in Malegaon committed suicide due to harassment from her in-laws. Police arrested her husband, mother-in-law, and father-in-law. The husband was found in Ahilyanagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.