शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्र बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:26 AM

शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे

ठळक मुद्देविकेंद्रीकरण विरोधात महा-ई सेवा केंद्रचालक संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाच्या नवीन भूमिकेमुळे महा-ई सेवा केंद्रावर गंडांतर येत असून, महा-ई सेवा केंद्रातून दिल्या जाणार्‍या सेवांचे विकेंद्रीकरण करुन त्या संग्राम किंवा सी. एस. सी. केंद्रांना देऊ नये, अशी मागणी महा-ई सेवा केंद्रचालकांनी शासनाकडे यापूर्वी केली होती; मात्र  या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महा-ई सेवा केंद्रचालकांनी १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शासनाची ध्येय धोरण, लोकहितकारी विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याठी सरकारने २00८ ला महा-ई सेवा  केंद्र सुरु केले होते. त्यावेळेस हजारो सुशिक्षित बेकारांनी आपल्याकडील जमीन-दागिने, तर वेळप्रसंगी कर्ज काढून स्वत: गुंतवणूक करुन सरकार नियुक्त महा-ई सेवा केंद्र सुरू करुन रोजगार सुरु केला; परंतु मध्यंतरीच्या काळात सरकार तथा नियुक्त आस्थापनेद्वारा प्रत्येक ग्रा.पं. मध्ये सरकारी खर्चाने ‘संग्राम’ उभारणी व अर्जदाराची कोणतीही चौकशी न करता एकाच गावात डिजिटल सेवा केंद्र मोफत वाटण्यात आले. महा-ई सेवा केंद्रातून मिळणार्‍या सर्व सुविधा वरील संदर्भान्वये या संग्राम आणि सी.एस.सी. केंद्रांनाही दिल्याने एकाच गावात मोठय़ा प्रमाणात दुकानदारी सुरु झाली. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला होता. दरम्यान, या निवेदनाबाबत शासन स्तरावर अद्यापही दखल घेतल्या गेलेली नाही. नवीन धोरणानुसार २४ नोव्हेंबर रोजी सीएससी केंद्रांना महा-ई सेवा केंद्राच्या सर्व सेवा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असल्याने महा-ई सेवा केंद्रचालकांच्या मागणीबाबत तातडीने कारवाई अपेक्षित होती; मात्र तसे न झाल्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत १३ व १४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय संप पुकारला. परिणामी तालुक्यातील सर्व ३२ महा-ई सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेवाकेंद्रातून मिळणारे दाखले उपलब्ध न झाल्याने नागरिकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शासनाने आमच्या मागणीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज गायकवाड, उध्दव थुट्टे पाटील, सुनील राठोड, नंदकिशोर गोडवे, मो.शहा, बनकर, राहुल खरात, शिवदास मोटे, शिवदास कापसे, विजय महाजन, गणेश सोळंकी, दीपक शेटे,  गजानन आखरे, इम्रान खान, पुरूषोत्तम पडघान, विनोद भगत आदी महा-ई-सेवा केंद्रचालकांनी केली आहे.