शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या भेटीनंतर प्रशासन लागले कामाला

By admin | Updated: July 23, 2015 00:32 IST

मग्रारोहयोच्या कामावर भर देण्याचे बुलडाणा जिल्हा परिषद सीईओंचे अधिका-यांना निर्देश.

 संग्रामपूर (जि. बुलडाणा) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी २२ जुलै रोजी संग्रामपूर पंचायत समितीला भेट देऊन पंचायत समितीमधील कामकाजाचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकार्‍यांना कामकाजात सुसूत्रता आणून गती वाढविण्याबाबत निर्देश दिले. दीपा मुधोळ यांचा येथील पंचायत समितीला नियोजित दौरा चार वेळा रद्द झाल्यानंतर २२ जुलै रोजी भेट देऊन येथील कामकाजाबाबत पाहणी करून आढावा घेतला. या भेटीच्या वेळी त्यांनी संग्रामपूर पं.स.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्वात अगोदर मग्रारोहयोच्या कामांचा आढावा घेतल्या गेला. नरेगाची कामे तसेच विहिरीच्या कामांबाबत दिरंगाई केल्यास कारवाईचे आदेश मुकाअ मुधोळ यांनी दिले. त्यानंतर तालुक्यातील नरेगाची कामे व मग्रारोहयो कामांची ग्रामसेवकांकडून आकडेवारी जाणून घेतली. ही कामे मग्रारोहयोचे जॉब कार्डधारक मजुरांकडून कुशल तसेच इतर कामे करून घेण्याची समज संबंधित अधिकारी यांना दिली. खासदार दत्तक ग्राम करमोडाचा आढावा घेतला असता, करमोडा येथील नरेगा तसेच मग्रारोहयोची कामे अपूर्ण असल्याचे समजले. त्यावर कामांना गती देण्यास सांगितले. तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये घर कर तसेच पाणी कर वसुलीची टक्केवारी वाढविण्याची ताकीद ग्रामसेवकांना दिली. ज्या ग्रामसेवकांवर तीन ग्रामपंचायतीचा प्रभार आहे, त्यांचा प्रभार कमी करण्याचे आदेश बीडीओंना दिले. यामध्ये संग्रामपूर पं.स.मधील असा कोणताच ग्रामसेवक आढळला नाही. बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत येणार्‍या सर्व अंगणवाडींचा आढावा घेतला. संग्रामसंबंधी सर्व माहिती जाणून घेतली व ऑनलाईनवर भर देण्याचे मुधोळ यांनी सांगितले. बांधकाम व पंचायत आदी विभागातील आढावा घेत यासंबंधी सर्व अपडेट देण्यास सांगितले. ग्रामपंचायत घरकर, पर्यावरण, वृक्षलागवड, विशेष घटक योजना, दलित वस्तीची कामे इत्यादी १५ ऑगस्टपूर्वी करावी, १00 टक्के शौचालय पूर्ण करून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.या आढावा सभेला अतिरिक्त मुकाअ हजारे, उपमुकाअ (सामान्य) राजेंद्र पाटील, बीडीओ डॉ.डी.आर.हिरोळे, ता.आ.अधिकारी डॉ.सोमवंशी, गशिअ पी.पी.खिरोडकार, बाविप्र अधिकारी सर्मथ शेवाळे, पशुसंवर्धन तालुका अधिकारी डॉ.सोनोने, बांधकाम विभाग शाखा अभियंता एस. के.गोरे, विनय घिवे, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी पु.अ.पाठक तसेच पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.