शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वसुलीसाठी प्रशासनाचा आटापिटा!

By admin | Updated: March 22, 2017 03:03 IST

७१ टक्के वसुली; निर्धारित उद्दिष्टपूर्तीसाठी उरले ११ दिवस.

वाशिम, दि.२१- जिल्ह्याचे महसूल वसुलीचे निर्धारित ४३ कोटी ५१ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाचा आटापिटा सुरू आहे. तथापि, २0 मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाला ३0 कोटी ९१ लाख ९९ हजार म्हणजेच केवळ ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले आहे. आता उर्वरित १0 दिवसांत त्यांना महसूल वसुलीचे काम वेगाने करावे लागणार आहे. शासनाच्यावतीने यंदा वाशिम जिल्ह्यासाठी ४३ कोटी ५१ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. यामध्ये प्रपत्र अ गौण खनीज आणि करमणूक कराचा समावेश होता. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या वारंवार बैठका आयोजित करून महसूल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. त्यामुळे महसूल वसुलीची कार्यवाही वेगात सुरू झाली, तरी २0 मार्चपर्यंत जिल्ह्याची महसूल वसुली ३0 कोटी ९१ लाख ९९ हजारापर्यंतच होऊ शकली आहे. त्यामध्ये वाशिम उपविभागातील वाशिम तालुक्यात निर्धारित १0 कोटी ५४ लाखांपैकी ९ कोटी ६५ लाख २१, मालेगाव तालुक्यात निर्धारित ५ कोटी ४७ लाखांपैकी २ कोटी ३४ लाख ३८ हजार, रिसोड तालुक्यात निर्धारित ६ कोटी ३३ लाखांपैकी ४ कोटी १८ लाख २ हजार, असे तीन तालुके मिळून एकूण २२ कोटी ३४ लाखांच्या निर्धारित उद्दिष्टापैकी १६ कोटी १७ लाख ७९ हजारांची वसुली केली. तर कारंजा उपविभागातील मंगरुळपीर तालुक्यात निर्धारित ६ कोटी २९ लाखांच्या उद्दिष्टापैकी ४ कोटी ४0 लाख ८४ हजार, मानोरा तालुक्यात ५ कोटी ४१ लाखाच्या उद्दिष्टापैकी १ कोटी ४६ लाख ३१ हजार आणि कारंजा तालुक्यात ९ कोटी ४७ लाखांच्या उद्दिष्टापैकी ८ कोटी २ लाख ८३ हजारांची वसुली झाली आहे. त्याशिवाय खणीकर्म विभागाकडील २ कोटी ३0 लाख ५३ हजारांची वसुली मिळून जिल्हा प्रशासनाला केवळ ३0 कोटी ९१ लाख ९९ हजार अशी ७१.0६ टक्के वसुली करणे शक्य झाले आहे. उर्वरित १२ कोटी ५९ लाख २५ हजारांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल विभागाला विशेष मोहीम राबविण्यासह कसोशीचे प्रयत्न करावे लागतील.