एसटी बसला अपघात;  २३ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 02:03 PM2020-01-04T14:03:39+5:302020-01-04T14:03:58+5:30

चालक तुषार जोहरी यांनी ब्रेक लावून बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतू  बस थांबवता आला नाही. समोर असलेल्या टेकड्यावर बस चढल्याने अपघात झाला.

Accident of ST bus; 23 student injured | एसटी बसला अपघात;  २३ विद्यार्थी जखमी

एसटी बसला अपघात;  २३ विद्यार्थी जखमी

Next

मोताळा (बुलडाणा) : तांत्रिक कारणामुळे एसटी बसचा अपघात झाल्याने २३ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास कोथळी फाट्याजवळ घडली. या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नसून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. जखमींवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मलकापूर आगाराची एम-एच-०६ एस - ८०३७ क्रमाकांची मोताळा- चिंचखेड नाथ ही मुक्कामी बस शनिवारी पावणे सहा वाजता चिंचखेड नाथवरुन निघाली. बससमध्ये सकाळच्या शाळेसाठी येणारे विद्यार्थी होते. चिंचखेडनाथपासून २० मिनिटाच्या अंतरावर अचानक बसचे स्टेअरिंग फ्री झाले. चालक तुषार जोहरी यांनी ब्रेक लावून बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतू  बस थांबवता आला नाही. समोर असलेल्या टेकड्यावर बस चढल्याने अपघात झाला. या अपघातात बसमधील २३ विद्यार्थी जखमी झाले. अपघाताच घडताच चालकाने कोथळी येथे फोन करुन माहिती दिली. त्यामुळे तत्काळ नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले. खासगी वाहनाने जखमींना मोताळा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचार केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.

अशी आहेत जखमींची नावे

बस अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अर्जून सोनारे, नवलसिंग साबळे चिंचखेड नाथ, विपूल राठोड, प्रतीक्षा राठोड, वैष्णवी सातव, ऋतुजा बिचकुले, ईश्वर राठोड निमखेड, पूजा हिवरे इब्राहिमपूर, करुणा सरकटे , पूजा सावळे, सागर सरकाटे, मंगेश पाटोळे, शुभम शिंदे कोथळी, वनिता घोरपडे, अश्विनी पाटील, अजय साळोकार पिंपळगाव नाथ, नेहा राठोड, निकिता राठोड, पायल राठोड, राजनंदिनी चव्हाण गिरोली, आकाश सुरडकर, सिध्दार्थ इंगळे धामगणाव देशमुख यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळाकडून तातडीची मदत

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना २२ हजार ५०० रुपये तातडीची मदत देण्यात आली. तसेच नुकसान भरपाईचे अर्ज भरुन घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या औषधोपचाराचा खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येईल, असे अधिकाºयांनी सांगितले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी ए. यू. कच्छवे, यंत्र अभियंता स्वप्नील धनाड, बुलडाणा आगार व्यवस्थापक रवी मोरे, आगार प्रमुख दीपक साळवे, वाहतूक निरीक्षक प्रमोद सनगाळे हजर होते.

Web Title: Accident of ST bus; 23 student injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.