शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडिटच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे ऑडिट करण्यात येणार असून यासंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच एक आदेश काढणार ...

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे ऑडिट करण्यात येणार असून यासंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच एक आदेश काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ऑक्सिजनची गळती, रुग्णांना तो देताना त्याचा दाब व दुर्घटना टाळण्यासाठी प्लांट उभारताना योग्य काळजी घेतली आहे किंवा नाही, याची यात प्रामुख्याने पाहणी होणार आहे. यासंदर्भात महसूल यंत्रणा आणि आरोग्य विभागाने २३ एप्रिल रोजी एका बैठकीत सविस्तर चर्चा केली असून अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनीही कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांशी याबाबत एका छोटेखानी बैठकीत माहिती घेतली.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून ऑक्सिजन उपलब्धतेसंदर्भातच अडचणी असल्याने अनुषंगिक पावले उचलली गेली नव्हती. मात्र जिल्ह्याला आता जवळपास दहा केएल ऑक्सिजन उपलब्ध झाला असून आगामी पाच दिवसांची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. २३ एप्रिल रोजी ५.३ केएल आणि २४ एप्रिल रोजी ६ केएल ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, ऑक्सिजनचे वैद्यकीय ऑडिट करताना रुग्णांना ऑक्सिजन देताना तो योग्य पद्धतीने दिला जातो किंवा नाही, त्यात सुसूत्रता आहे किंवा नाही, अशा बाबींचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. साधारणत: सरासरी ३० लिटर प्रतिमिनिट या दाबाने हा ऑक्सिजन रुग्णांना देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून ऑक्सिजन गळती व त्याचा अपव्यय टाळण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे यासंदर्भातील नोडल अधिकार यांनी सांगितले. आयसीयूमधील ऑक्सिजनवरील रुग्ण व आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण यांना नेमका किती दाबाने ऑक्सिजन द्यावा, यासंदर्भातील सुसूत्रताही आणण्याचा याद्वारे प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्न आहे.

--प्रतिदिन १२.७३ मेट्रिक टनाची गरज--

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालये मिळून प्रतिदिन १२.७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून महिन्याकाठी ३९५ मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्ह्यास लागणार आहे. त्यादृ्ष्टीनेही यंत्रणेने नियोजन केले आहे.

--बर्फ काढण्यास प्राधान्य--

ऑक्सिजन प्लांटवरील व्हेपोरायझरवर द्रवरुप ऑक्सिजनचे वायूमध्ये रुपांतर होताना बर्फ साचतो. त्यामुळे येथील पाईप व जोड असलेल्या ठिकाणचे नटबोल्ट खराब होऊन गळती होण्याची भीती असते. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटवर हा बर्फ नियमित स्वरुपात काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.