समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
By संदीप वानखेडे | Updated: June 8, 2024 15:57 IST2024-06-08T15:57:13+5:302024-06-08T15:57:40+5:30
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली.

समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
डाेणगाव : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक समाेरील ट्रकवर आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ८ जून राेजी पहाटे डाेणगावजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. कलीम सय्यद सलीम (वय २४, रा. दारव्हा, जि. यवतमाळ) असे मृतकाचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली. यामध्ये धडक देणाऱ्या ट्रकमधील कलीम सय्यद सलीम व मिर्झा कुदरत बेग हे गंभीर जखमी झाले हाेते. यामध्ये कलीम सय्यद सलीम यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. जखमीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डाेणगाव पाेलिसात वृत्त लिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.