भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
By अनिल गवई | Updated: July 6, 2024 23:29 IST2024-07-06T23:27:19+5:302024-07-06T23:29:13+5:30
ही घटना खामगाव-शेगाव रोडवरील वसंत महाराज अन्नकुटीजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली.

भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
खामगाव : भरधाव कार ट्रॅक्टरला धडकल्याने झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव-शेगाव रोडवरील वसंत महाराज अन्नकुटीजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली.
प्राप्तमाहितीनुसार, अंशदीप सतपालसिंह सलुजा २२ रा. लक्कडगंज, खामगाव असे मृतकाचे नाव आहे. त्याची शेगाव रोडवर हॉटेल असून. या हॉटेलमध्ये जात होता. त्यावेळी समोर असलेल्या ट्रॅक्टरवर पाठीमागुन भरधाव कार आदळली. त्यामुळे हा अपघात घडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी लगेचच अंशदीपला जखमी अवस्थेत खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविले. तेथे तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर मृतावस्थेत त्याला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे खामगाव येथील सलुजा कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच खामगाव येथील सलुजा कुंटुबियांच्या निकटवर्तीयांसोबतच नातेवाईकांनी सामान्य रूग्णालयात धाव घेतली होती.