नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:40 IST2025-10-02T23:40:09+5:302025-10-02T23:40:31+5:30
परिसरात तणावपूर्ण वातावरण

नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
नांदुरा (जि.बुलढाणा): २ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी सकाळी नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे भीषण अपघात घडला. या अपघातात गावातील गायत्री खंडारे (वय अंदाजे १०-११ वर्षे) हिचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आणि घटनेला सामाजिक पार्श्वभूमी जोडली गेल्याने गावात व परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.