शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:02 AM

बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.गेल्या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन मुबलक झाले होते. राज्य  शासनाने विदर्भ  कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड  आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतकर्‍यांची दहा लाख ४९  हजार २२२ क्विंटल तूर बुलडाणा जिल्हय़ात खरेदी केली होती.  त्यापोटी शेतकर्‍यांना ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार १९ रुपये  राज्य शासनाला अदा करावयाचे होते; मात्र मधल्या काळात ही  रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ओरड होती. राज्य शासनाकडून ही ओरड पाहता जिल्हय़ासाठी ५२९ कोटी  ८५ लाख ७३ हजार रुपयांची ही रक्कम जिल्ह्यास पूर्वीच प्राप्त  झाली असून, त्यापैकी बहुतांश रकमेचे वाटप करण्यात  आल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्यापही ४८ लाख रुपये शे तकर्‍यांची देणी बाकी आहे; मात्र बँकिंग स्तरावरील पत पुरवठय़ाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम अद्याप शे तकर्‍यांना मिळालेली नाही; मात्र तीही लवकरच शेतकर्‍यांना  मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गतवर्षीचे मुबलक तुरीचे पीक आणि त्यानंतर काही ठिकाणी तूर  खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे तुरीचा मुद्दा राज्यभर  गाजला होता. त्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने पावले उचलत तूर  खरेदीला प्राधान्य दिले होते.चार ऑक्टोबर २0१७ अखेर जवळपास १३ हजार ६९९  िक्वंटल तुरीच्या खरेदीपोटी शेतकर्‍यांना सहा कोटी ९१ लाख  ८१ हजार ५६६ रुपये अदा करणे बाकी होते; मात्र ही रक्कमही  गेल्या पाच ते सात दिवसापूर्वीच उपलब्ध झालेली  असून,  मार्केटिंग विभागाकडून ती संबंधित बँकांकडे वळती करण्यात  आलेली आहे.

शेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूरगतवर्षी तुरीचे मुबलक पीक झाल्यामुळे बाजारात मोठय़ा  प्रमाणवर तूर विक्रीस आली होती. त्यामुळे उडणारा गोंधळ व  कमी भावात खरेदी केली जाणारी तूर पाहता राज्य शासनाने थेट  बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत दोन लाख ९४८ क्विंटल तूर खरेदी  केली होती. नाफेड अंतर्गतही मोठय़ा प्रमाणावर तूर खरेदी  करण्यात आली होती. या उपरही सध्या जिल्ह्यात दोन लाख ६0  हजार २९६ क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून असल्याचा  अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी