मोटारसायकलच्या डिक्कीतून ४0 हजार लंपास

By Admin | Updated: July 7, 2015 00:09 IST2015-07-06T23:52:20+5:302015-07-07T00:09:50+5:30

खामगावात चोरांची हिंमत वाढली; चो-यांच्या घटना वाढत्याच.

40 thousand laps from motorcycle trunk | मोटारसायकलच्या डिक्कीतून ४0 हजार लंपास

मोटारसायकलच्या डिक्कीतून ४0 हजार लंपास

खामगाव : स्कूटीची डिक्की तोडून चोरट्याने त्यातील ४0 हजार रुपये लंपास केल्याची घटना ६ जुलै रोजी दुपारी येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर घडली. अब्दुल जावेद अ. रशीद (२0 रा.बर्डे प्लॉट) याने महाराष्ट्र बँकेतून ४0 हजार रुपये काढून स्कूटी (एमएच २८-0६६५) च्या डिक्कीत ठेवले. सदर पैसे ट्रान्सपोर्ट व्यवहारापोटी संबंधितांच्या खात्यात भरण्यासाठी तो येथील स्टेट बँकेत स्कूटी घेऊन आला होता. तो पैसे भरण्याची स्लीप आणण्यासाठी बँकेत गेल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने स्कूटीची डिक्की तोडून पैसे लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 40 thousand laps from motorcycle trunk