शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

२८0 कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Updated: January 9, 2015 01:34 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक, आराखड्यात ४0 कोटींची भर.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासाठी २८0 कोटी २१ लाख ७४ हजार रूपये खर्चाच्या वार्षिक प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात आणखी ४0 कोटीची भर टाकली जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यासाठी अच्छे दिन आणणार असल्याचे संकेत आज पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे हे होते. खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार पांडुरंग फुंडकर, आ.राहुल बोंद्रे, आ.चैनसुख संचेती, आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ.अँड.आकाश फुंडकर, आ. डॉ. शशीकांत खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना पालकमंत्री खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून होणार्‍या धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी आता बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ७५ लाखाची तरतूद केली असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी दोन कोटीचा निधी लागणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधानगृह व बैठक व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यासोबतच जिल्हास्तरावर महिला समुपदेशन केंद्रांची स्थापना केली जाणार असून, यासाठी ५0 लाखाची तरतूद केली आहे. ही व्यवस्था तालुकास्तरापर्यंंत नेणार आहे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीचे विशेष प्रयत्न केले जातील.पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यासोबत अनेक वर्षांपासून ऋ णानुबंध असल्याने येथील प्रश्न व समस्यांची जाण असल्याचे सांगुन प्रत्येक प्रश्नावर सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या, सर्वांंचे समाधान होईल असा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले. अनेक योजनांना मंजुरी दिली असून, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. विकासासाठी आणखी ४0 कोटीचा निधी वित्त मंत्रालयाकडे मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.