शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कन्यारत्न प्राप्त २00 महिलांचा सन्मान!

By admin | Updated: August 3, 2015 01:37 IST

मानतकर कुटुंबीयांचा असाही उपक्रम; मुलीच्या जन्माचे स्वागत.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मुलींचा जन्मदर झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. याचे दुष्परिणाम आता शहरी भागातील नागरीकांनाच नव्हे, तर खेड्यातील लोकांनाही समजू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे हिवरा गडलिंग येथील मानतकर कुटुंबीयांमध्ये कन्यरत्न जन्माला आल्याने त्यांनी स्वागतप्रित्यर्थ गावातील कन्यारत्न जन्माला घालणार्‍या २00 मातांचे साडीचोळी देऊन स्वागत केले. प्रत्येक घरात जिजाऊ, सावित्री जन्माला यावी, असे प्रत्येकाला वाटते. विचार मंथनही होते. पण मुलीकडी पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. मात्र सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरागडलिंग येथे मुलीच्या जन्माचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. २0१४ च्या मे महिन्यात या गावात डेंग्यु सदृष्य रोगाची लागण झाली होती. २0 ते २५ बालकांच्या पेशी कमी होवून त्यांना औरंगाबाद, जालना, बुलडाणा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातच तुळशिराम मानतकर यांची सात वर्षाची कन्या कु.पल्लवी हिलाही डेंग्युची लागण झाली. उपचारा दरम्यान ६ मे रोजी पल्लवीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या घरी २४ जुलै रोजी पुन्हा शारदा व तुळशिराम मानतकर दाम्पत्यांनी कन्यारत्न झाले. कन्यारत्न जन्माला आल्याच्या आनंदात मानतकर कुटूंबियांनी एकत्रित येऊन एका कार्यक्रमाचे आयोजन करुन कन्यारत्नाला जन्म घालणार्‍या २00 मातांचा साडी चोळी देवून सन्मान केला.