शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी १७ लाख क्विंटल बियाणे!

By admin | Updated: May 6, 2015 00:52 IST

राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले

अकोला : येत्या खरीप हंगामात कृषी विभागाने राज्यातील १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पेरणीचे नियोजन केले आहे. बियाणे बदल दरानुसार १६ लाख ६४ हजार ११४ क्विंटल बियाण्यांची गरज असताना, प्रत्यक्षात या एकूण क्षेत्रासाठी लागणार्‍या विविध बियाण्यांच्या मागणीपैकी १७ लाख १0 हजार ९२0 क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्या आणि शेतकर्‍यांजवळील बियाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा कृषी अधिकार्‍यांनी केला. यावर्षी १४९.४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४0 लाख हेक्टर बीटी कापूस आणि ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता एकूण ८६,0१७ क्विंटल बीटी कापूस, तर १0,३६,५१५ क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. या नगदी पिकांनंतर धान हे राज्यातील तिसर्‍या क्रमाकांचे पीक असूून, कोकण आणि विदर्भातील १४.९२ लाख हेक्टर क्षेत्रासाठी २,११,५१३ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. खरिपात तूर या पिकाचे क्षेत्र ११.४३ लाख हेक्टर आहे. या तुरीसाठी ६३,३३८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. संकरित ज्वारीचे क्षेत्र नऊ लाख हेक्टर आहे. या क्षेत्रासाठी ६८,३२५ क्विंटल बियाणे लागणार असल्याने ज्वारीचे बियाणे शेतकर्‍यांना मिळणार आहे. संकरित बाजरीचे क्षेत्रही राज्यात नऊ लाख हेक्टर आहे. या बाजरीच्या क्षेत्रासाठी २३,२४0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. याचसोबत खरिपात मूग, उडीद या डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात मूग ५.३४ लाख, तर उडिदाचे क्षेत्र ४.४७ लाख हेक्टर आहे. याकरिता २६,0७१ हजार मूग, तर उडिदाचे ३४,८८२ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. मका या पिकाचे क्षेत्र राज्यात ७.८७ लाख हेक्टर आहे. या पिकाकरिता १,२९,१00 लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. सुधारित ज्वारी राज्यात १.३९ लाख हेक्टरवर घेण्यात येणार आहे. यासाठी २६५0 क्विंटल बियाणे लागणार असून, सुधारित बाजरीचे क्षेत्र २.४५ लाख हेक्टर आहे. याकरिता ७,९३0 क्विंटल बियाणे लागेल. खरिपात २.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमूग घेतला जातो. त्यासाठी १८,६२५ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. तिळाचेही क्षेत्र 0.७0 हेक्टर असून, सुधारित कापसाचे क्षेत्र हे 0.५0 हेक्टर आहे. तिळाचे १,११४ क्विंटल, तर संकरित कपाशीचे १६00 क्विंटल बियाणे लागणार आहे.