शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:48 PM

जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे. 

बुलडाणा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे. मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या  परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा लागली होती. अखेर ८ जून रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.  दहावीच्या निकालावरच शाळेचे यश अवलंबुन असते. अनेक पालक तर दहावीचा निकाल पाहून आपल्या पाल्याला त्या शाळेत टाकायचे की नाही, हे ठरवतात. त्यामुळे दहावीचा उत्कृष्ट निकाल लागावा, अर्थात १०० टक्के निकालासाठी शाळा कसोशीने प्रयत्न करते. जिल्ह्याचा एकूण निकाल ७७.०७ टक्के लागला आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५१८ शाळांपैकी १० टक्के शाळा म्हणजे ५२ शाळांनी १०० टक्के निकालावर मजल मारली आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, मोताळा चार, चिखली तालुक्यातील १०, देऊळगाव राजा तालुक्यातील पाच, सिंदखेड राजा चार, लोणार दोन, मेहकर दोन, खामगाव नऊ, शेगाव एक, नांदूरा १, मलकापूर दोन, जळगाव तीन व संग्रामपूर तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. अशा जिल्ह्यातील एकूण ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यातील काही शाळा गतवर्षी सुद्धा १०० टक्क्यावर होत्या. १० टक्क्यापर्यंत च्या तीन शाळा जिल्ह्यातील तीन शाळा १० टक्क्यापर्यंत पोहचू शकल्या. मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल अवघा ८.६९ टक्के लागला आहे. तर मेहकर तालुक्यातील शिंगणे विद्यालय खंडाळाचा निकाल ६.८९ टक्के लागला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुलचा निकाल १०.३४ टक्के लागला आहे. चिखली अव्वल दहावीच्या १०० टक्के निकालात चिखली तालुक्यातील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. चिखली तालुक्यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSSC Resultदहावीचा निकालSchoolशाळा