शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय चौकशीमुळे जि.प. मध्ये खळबळ

By admin | Updated: April 26, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी मागीलवर्षी कामांमध्ये अनियमितता केली.

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी धावपळ प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी मागीलवर्षी कामांमध्ये अनियमितता केली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका लावून धरली. यामुळे याप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु झाली आहे. या आशयाचे वृत्त मंगळवारला प्रकाशित होताच या वृत्तामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली. दरम्यान सदर प्रकरण दडपण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. लघु सिंचाई विभागात मामा तलाव व अन्य कामांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेची मोठी व्याप्ती राबविली आहे. याकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी प्रत्येक जिल्ह्याला दिला आहे. या अनुषंगाने भंडारा लघु पाटबंधारे विभागाला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. मात्र या निधीतून काम करण्याऐवजी लाखो रूपयांचा निधी शासनाकडे परत पाठविला. यासोबतच प्रस्तावित कामांचा निविदा काढताना अनियमितता केली होती.तांत्रिक कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता सोसायटीला न देता मजूर सहकारी संस्थांना दिली. यासह अन्य महत्वांच्या विषयाला घेऊन ‘लोकमत’ने २०१६ च्या एप्रिल व मे महिन्यात वृत्त मालिका लावून धरली. या वृत्तांची दखल मंत्रालयात घेण्यात आली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले आहे. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश बजावले आहे. पाच विविध विषयांना घेऊन पी.एस. पराते यांच्या विभागीय चौकशीचे आदेश धडकल्याचे वृत्त मंगळवारला ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली. आज दिवसभर जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक विभागात या विषयावर चर्चा सुरू होत्या. लघु पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांमध्येही दबक्या आवाजात ‘साहेबांवर कारवाईचा बडगा आला’ अशी चर्चा सुरु होती.अधिकाऱ्यांची सावरासावर सुरूलघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करता यावा याकरिता कामांमध्ये अनियमितता केली. पराते हे ३१ मे ला सेवानिवृत्त होत आहे. दरम्यान प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु झाल्याने पराते यांना सेवानिवृत्तीपुर्वीच प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कारवाईचा ससेमिरा लागू नये यासाठी त्यांनी आता वरिष्ठ अधिका-यांकडे या प्रकरणातून ‘सहीसलामत’ सोडण्यासाठी गळ घातला असल्याचे बोलले जात आहे.