पत्नी माहेरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:03+5:302021-09-16T04:44:03+5:30

बारव्हा : किरकोळ भांडणानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेल्याच्या तणावातून एका तरुणाने पत्नीच्या साडीनेच गळफास लावून आत्महत्या केल्याची ...

Young man commits suicide after his wife leaves | पत्नी माहेरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

पत्नी माहेरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

बारव्हा : किरकोळ भांडणानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेल्याच्या तणावातून एका तरुणाने पत्नीच्या साडीनेच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

अजित कुशन रामटेके (३५) असे मृताचे नाव असून तो मजुरीचे काम करीत होता. गरिबीला कंटाळून तो नेहमी मानसिक तणावात राहायचा. त्यामुळे त्याचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. कोरोना काळात कामधंदे, कोणतेही रोजगार नसल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यातच नेहमीच पती पत्नीचे किरकोळ खटके उडायचे. सोमवारी पत्नीसोबत भांडण झाले. पत्नी मुलांना घरीच ठेवून माहेरी निघून गेली. तो विरह सहन न झाल्याने अजितने मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास पत्नीच्याच साडीनेच गाठ्यात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. त्याच्या मागे पत्नी मुलगा व मुलगी आहे. तपास दिघोरीचे पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide after his wife leaves