शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात वृक्ष लागवडीचा फज्जा

By admin | Updated: July 14, 2014 00:22 IST

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा ३० हजार वृक्ष

बिलाची केली उचल : बावनथडी मुख्य कालव्यातील प्रकार
तुमसर : बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाने बावनथडी प्रकल्प विभागाला दिले होते. सध्या येथे एकही वृक्ष उमललेले नसल्याने तीस हजार वृक्ष लागवड योजनेचा फज्जा उडाला आहे. याउलट वृक्ष लागवडीच्या बिलाची उचल करण्यात आली आहे. वृक्ष अस्तित्वात नाहीत तर बिल कसे मंजूर झाले? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
बावनथडी (राजीव सागर) आंतरराज्यीय प्रकल्पाचा मुख्य उजवा कालवा २६.२१ किलोमीटर लांबीचा आहे. तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमधून हा कालवा घनदाट, संरक्षित जंगलांमधून जातो. वन व पर्यावरण विभागाने कालवा प्रकल्पांतर्गत येणारी झाडे तोडण्यासाठी बरीच वर्षे परवानगी दिली नव्हती. त्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
वनकायद्यातून या प्रकल्पाला बाहेर काढण्यासाठी ३५ वर्षांची वाट पहावी लागली. वन विभागाने मुख्य उजव्या कालव्याच्या बांधकामाला काही अटीवर परवानगी दिली. मात्र त्या सोबतच मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा जवळपास ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही बावनथडी प्रकल्प विभागाला देण्यात आले होते.
प्रकल्प विभागानेही ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी दिली होती. एक ते दीड वर्षांपूर्वी प्रकल्पातर्फे येथे वृक्ष लागवडीला थातूरमातूर प्रारंभ करण्यात आला. परंतु येथे एकही वृक्ष जगला नाही. हे वृक्ष प्रकल्पातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी लावली होती. परंतु येथे उजव्या कालव्याशेजारी गावातील नागरिकांची नावे घालून रकमेची उचल करण्यात आली. अशी माहिती आहे. खोटे बिल सादर करून बिल मंजूर करण्यात आले व त्याची उचलही करण्यात आली. अशी विश्वसनीय माहिती आहे. कालव्याच्या दुतर्फा असलेली झाडे ही फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
तत्कालीन उपविभागीय अभियंता पिसे हे या वृक्ष लागवडीचे प्रमुख होते. बिलाची रक्कम उचल करताना संबंधित विभाग जागरुक नव्हते काय? असा सवाल आहे. उद्दिष्ट देणाऱ्यांचेही या ठिकाणी दुर्लक्ष झाले आहे. मुख्य उजव्या कालव्याचा परिसर ओसाड दिसतो. केवळ खुरटी झाडे येथे निदर्शनास आहेत.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत हा प्रकल्प येतो. आतापर्यंत येथे निरीक्षणाकरिता अनेकदा पथक येऊन गेले. परंतु कुणीही गंभीरतेने दखल घेतलेली नाही. वनविभागानेही या योजनेअंतर्गत चौकशीही केली नाही. झाडे लावली कुणी? कुठे गेली? याची शहानिशाही करण्यात आलेली नाही.
(तालुका प्रतिनिधी)