शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
3
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
4
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
5
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
6
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
7
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
8
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
9
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
10
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
11
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
12
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
13
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
14
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
15
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
16
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
17
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
18
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
19
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
20
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
Daily Top 2Weekly Top 5

जगाला तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : वरठी येथे सार्वजनिक बौद्ध विहाराच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : जगाला अहिंसेचे तत्वज्ञान तथागत गौतम बुद्ध यांनी दिले. प्राणीमात्रावर प्रेम, मैत्री व करुणा द्यावे, असे सूत्र त्यांनी जगाला पटवून दिले. बुद्धांचे तत्वज्ञान विज्ञानावर अवलंबून असून सुखाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकांनी सुख व शांती प्राप्त करण्यासाठी स्वत: तपावे लागते असे सांगितले. जगात शांतता नांदावयाची असेल तर तथागत गौतम बुध्द यांच्या तत्वज्ञानानुसार चालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सार्वजनिक बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक बौद्ध विहार इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना भदंत संघधातू यांच्या हस्ते करण्यात आली.
बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अनमोल चव्हाण, कल्याण डोंगरे, राजेश मेश्राम, रमेश रामटेके, दिलीप गजभिये, रवींद्र बोरकर, प्रमोद वासनिक, सत्यवती मेश्राम, विवेक बौद्ध व विनायक कांबळे उपस्थित होते.
संचालन तथागत मेश्राम, प्रास्ताविक देवदास डोंगरे व आभार प्रमोद वासनिक यांनी मानले. कार्यक्रमास माजी सरपंच संजय मिरासे, माजी उपसरपंच मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, शरदचंद्र वासनिक, श्रीकांत रामटेके, वसंत हुमणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, संघरत्न उके, सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे , शिल्पा गजभिये, राष्ट्रपाल नारनवरे, शुभांगी गणवीर, अरविंद येळणे, राजू भाजीपाले, संगीता सुखानी, सुनील बन्सोड, शेखर मडामे आदी उपस्थित होते.