कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:06+5:30

एक - दीड वर्षापासून जेएमसी कंपनीमार्फत उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. लाखनी शहरात केसलवाडा (फाटा) ते लाखनी स्मशानघाटापर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. या कामाकरिता बिहार, झारखंड, हरियाणा तसेच विविध राज्यातील सुमारे ४०० मजूर कामावर आहेत.

Workers struggle to get to the village | कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड

कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड

ठळक मुद्देलॉकडाऊ न वाढल्याने संकटात वाढ, मजुरांच्या समस्या सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लॉकडाऊ न ३ मे रोजी संपेल या आशेवर असलेल्या कामगारांच्या निर्णयाला शुक्रवारी १७ मे पर्यंत लॉकडाऊ नच्या निर्णय झाल्याने तडा गेला. त्यामुळे लाखनी येथील जेएमसी कंपनीच्या कामगारांनी गावी जाण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसून येते.
लाखनी शहरात गत एक - दीड वर्षापासून जेएमसी कंपनीमार्फत उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. लाखनी शहरात केसलवाडा (फाटा) ते लाखनी स्मशानघाटापर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. या कामाकरिता बिहार, झारखंड, हरियाणा तसेच विविध राज्यातील सुमारे ४०० मजूर कामावर आहेत. देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १९ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.मात्र लॉकडाऊनची वेळ तिनदा वाढविण्यात आली. त्यामुळे कामगारांच्या हिरमोड झाला.

बैठक निष्फळ
शासनाने मजुरांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्याचे घोषित केले. मजुरांनी तहसीलमध्ये शनिवारी धडक दिली. तालुका प्रशासनाने समजूतपणा घेत मजुरांसोबत बैठक घेतली.

ऊसतोड कामगारांप्रमाणे सुविधा द्या
ज्याप्रमाणे ऊसतोड कामगारांना साखर कारखान्यांनी स्वगृही जाण्यासाठी स्वत: प्रयत्न करून त्यांना स्वागवी सोडून दिले त्याचप्रमणे जेएमसी कंपनीने सुद्धा मजुरांना स्वगृही नेण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे.

Web Title: Workers struggle to get to the village