शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली.

ठळक मुद्दे१४०९ कामे सुरू : जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली, मजुरांना दिलासा

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात रब्बी हंगामानंतर मजुरांना कामे मिळणे कठीण झाले असताना रोहयोची कामे वाढविणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे केली जात असून, या कामांवर सात हजार १७६ मजूर कार्यरत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली आहे.हाताला काम नसेल तर शंभर दिवसाचा रोजगार पक्का म्हणून हमखास रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी रोजगार हमी योजना पुढे आली. काम नसेल तर बेरोजगार भत्ता असे घोषवाक्य या योजनेत जोडण्यात आले. यामुळे लाखो नागरिकांनी आपली रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नोंद केली. ही नोंद आता दोन लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली. प्रत्यक्षात कामावर गेल्याशिवाय मजुरी मिळणार नाही हे कळाल्यानंतर या कामावर कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच कमी झाली आहे. मजुरांना इतर ठिकाणी कामाच्या शोधात जायचे काम पडू नये, गावात किंवा परिसरातच त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिला जातात. जिल्ह्यात रबी हंगामाती कामे संपली असताना रोजगाराची समस्या गंभीर बनत आहे. दरदिवशी विविध ठिकाणावरून शेकडो मजूर नागपूर, पुणे, मुंबई आदी महानगरांसह परराज्यात रोजगारासाठी स्थलंतर करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात सध्या स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षा घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसह यंत्रणेंकडून रोहयोची कामे सुरू आहे. यात ८८ कामे यंत्रणांची आहे.

पवनी तालुक्यात     सर्वात कमी कामगार पवनी तालुक्यात सर्वात कमी मजूर कामावर आहे. सन २०२०-२१ ची आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर पवनी तालुका मजुरांमध्ये माघारलेला दिसतो. तालुकानिहाय आकडवारीनुसार भंडारा २६२४७, लाखांदूर ३४७८७, लाखनी ३५४२६, मोहाडी ४७५९, पवनी २९४११, साकोली ३६७८९, तुमसर ३४३११ मजुरांसाठी कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  मात्र ज्या प्रमाणात नोंदणी झाली. त्या प्रमाणात आजपर्यंत कधीच मजूर उपलब्ध झाले नाही. १४०९ ग्रामपंचायतंर्गत कामे सुरूआहे. 

रोजगार हमी योजनेत प्रत्येकांच्या हाताला काम मिळत असले तरी रोजगार हमी योजनेतील कामे अतिशय कठीण असतात. त्याऐवजी शेतशिवारात राबणाऱ्या मजुरांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळाली तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मजुरांनाही त्याचा फायदा मिळेल. मात्र तसे होत नाही. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे - शरद भूते,  शेतकरी.

शेतीची कामे संपल्यानंतर आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यात परिसरात रोहयोच्या कामांबाबत काही हालचाली दिसत नसल्याने मागणी करून फायदा होणार काय, असा विचार येतो. परिसरात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे. अनेकदा भर उन्हात रोहयोची कामे केली जातात. परिणामी मजुरांना त्रास होतो.- राजू सार्वे, बेरोजगार

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत