शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांअभावी कामकाज ठप्प

By admin | Updated: October 11, 2014 23:00 IST

परिसरातील पालोरा व मोहगाव येथील तलाठ्यांची पदे रिक्त आहे. पालोरा वगळता देव्हाडा, मोहगाव, करडी, मुंढरी येथील तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. स्वत:चे कार्यालय किंवा जमीनही नाही.

करडी (पालोरा) : परिसरातील पालोरा व मोहगाव येथील तलाठ्यांची पदे रिक्त आहे. पालोरा वगळता देव्हाडा, मोहगाव, करडी, मुंढरी येथील तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. स्वत:चे कार्यालय किंवा जमीनही नाही. जांभोरा येथे सुसज्ज इमारत तयार आहे. मात्र तलाठी किरायाचे घरात राहतात. एकही तलाठी मुख्यालयी राहत नाही. नागरिकांना विविध कामांसाठी वाट पाहत ताटकळत राहावे लागते.मोहाडी तालुक्यातील करडी येथे महसूल विभागाचे कामकाज व नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालय आहे. मंडळ अधिकारी म्हणून पठाण कार्यरत आहेत. तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय ग्रामपंचायत सचिवालयातील इमारतीत स्वतंत्रपणे आहेत. परंतु कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. मंडळ अधिकारी भंडारायेथून तर तलाठी तुमसर येथून अपडाऊन करतात. कार्यालय किरायाने आहेत. पालोरा व जांभोरा येथे तलाठ्यांची इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहेत. पालोरा येथील कामकाज स्वत:चे इमारतीतून सुरु आहे. मात्र जांभोरा येथील तलाठी कार्यालयाची इमारत धूळ खात उभी आहे. भाड्याचे घर सोडून स्वत:चे मालकीचे इमारतीत कार्यालय स्थालांतरित करण्याचे सौजन्य तलाठी राहांगडाले यांनी दाखविले नाही. मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांनी जबाब विचारण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. करडी परिसरातील सहा तलाठ्यांपैकी एकही तलाठी मुख्यालयी राहत नाही. परिणामी नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. अनेकदा नागरिक तलाठ्यांची वाट पाहत तासन्तास बसून असलेले दिसतात. (वार्ताहर)