शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

वित्तीय कंपन्यांकडून महिलांची पिळवणूक

By admin | Updated: September 16, 2014 23:32 IST

ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने

असहायतेचा फायदा : कारवाईची मागणीमोहाडी : ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने उपस्थित राहावे, अशी सक्तीही करण्यात येते. तुमसर शहरात जवळपास पाच ते सहा अशा फायनांस कंपन्यांनी आपले दुकान थाटले आहेत. या फायनांस कंपन््यांचे एजेंट तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिगरजु कुटूंब शोधून त्यांना कर्ज देतात. कर्ज देताना कुटूंबातील फक्त महिलांनाच कर्ज मंजूर करण्यात येतो. मात्र त्यात पतीच्या संमतीचीही अट असते. या फायनांस कंपन्या एका महिलेला कर्ज देत नाही त्यासाठी पाच पासून दहा महिलांचा एक गट तयार करूनच त्यांना एकमुश्त कर्ज देण्यात येतो. त्या गटातील प्रत्येक महिला एक दुसऱ्याची जामीनदार असते. या फायनांस कंपन्यांचा व्याजदर २४ ते २६ टक्के असतो. तसेच प्रोसेसिंग फी, विमा, सेवाकर इत्यादी प्रकारचे चार्जेस लावून अधिकचे पैसे उकळले जातात. दिलेल्या कर्जाची परतफेड कर्जानुसार २५० रूपया पाूसन ६५० रूपयापर्यंत दर आठवड्याला त्यांनी निश्चित केलेल्या दिवशी व ठिकाणी कर्ज घेणाऱ्या गटातील सर्व महिलांनी उपस्थित होऊन द्यावी लागते.समूहातील एखादे महिलेने कर्जाची रक्कम पाठविली मात्र उपस्थित झाली नाही तर वसुली एजंट इतर महिलांना धमकावतो व दंडसुद्धा वसूल करतो. एवढेच नाही तर पुढील आठवड्यात एखादा सण किंवा सुट्टी येत असली तर त्या आठवड्याची किस्त याच आठवड्यात भरण्याची शक्ती सुद्धा करण्यात येते. एकाच आठवड्यात दोन दोन किस्त भरताना या ग्रामीण महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या फायनांस कंपन्या सुलभ पद्धतीने कर्ज वाटप करीत असल्याने ग्रामीण जनता व्याजाचा दर न पाहता त्यांच्या आमिषाला बळी पडतात. मात्र कर्ज परतफेड केल्यावर कर्जाचे व्याजदर ३० ते ४० टक्के दराने द्यावे लागले हे नंतर समजते.घरातील समस्या सोडविण्यासाठी किंवा काही कामे करण्यासाठी ग्रामीण जनता सुलभ पद्धतीने मिळणाऱ्या या कर्जाकडे वळतात. तसेच या फायनांस कंपन्यांच्या व्याजाकडे पाहात नाही. नंतर तीन किंवा चार फायनांस कंपन्या कडूनही कर्ज काढली जातात. यामुळे ग्रामीण भागातील जनता व्याजाच्या व कर्जाच्या डोंगराखाली दबत चालली आहे. एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीकडून व दुसरीचे कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या फायनांस कंपनीकडून कर्ज काढण्याची पद्धत वाढत चालली आहे. मात्र यामुळे त्या महिला शेवटपर्यंत कर्जातच राहणार याचे त्यांना भान नाही. (शहर प्रतिनिधी)