महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:59+5:302021-02-05T08:41:59+5:30

29 लोक 10 शहापूर : स्त्री ही सर्व शोधांची जननी आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नये. स्त्रीला ...

Women should resist injustice | महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा

महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा

29 लोक 10

शहापूर : स्त्री ही सर्व शोधांची जननी आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नये. स्त्रीला अबला आहे हा कलंक पुसून आम्ही सबला आहोत, असा विश्‍वास निर्माण करायला हवा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे बाळकडू पाजले आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार प्राप्त करून दिले. स्त्रियांनी कुठलाही अन्याय सहन करता तेवढ्याच ताकदीने अन्यायाचा प्रतिकार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका प्रियाताई शहारे यांनी केले.

शहापूर येथील ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सलामे होते, तसेच सरपंच मोरेश्वर गजभिये, ग्रामविकास अधिकारी आर.डी. महंत यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण भुरे, अंगणवाडी सेविका मंगला गजभिये, ग्रामपंचायत सदस्य केशव तिरबुडे, शालू भुरे, छाया घरडे, रिना गजभिये, अल्का पाटील, अंगणवाडी सेविका लहाना राजूरकर, शारदा सेलोकर, शोभा सेलोकर, वैशाली भुरे, त्रिवेणी बेलेकर, धुरपता सरादे, पुरुषोत्तम शहारे, लीना खोब्रागडे, आशासेविका उषा मेश्राम, सुषमा कारेमोरे, अमृतकर, तिरबुडे, डोरले आदी मान्यवर उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. महिलांना हळदी-कुंकू लावून महिला मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना सरपंचांकडून पारितोषिक देण्यात आले, तसेच ग्रामपंचायतीतर्फेही भेटवस्तू देण्यात आल्या. संचालन सीमा खोब्रागडे यांनी केले, तर आभार छाया घरडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अलका पाटील, वैशाली भुरे, शालू भुरे, सीमा खोब्रागडे, किरण भुरे, बाबू भोंदे, अजय बांबोळे, शंकर लेंडे सहादेव लेंडे, बादल लेंडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Women should resist injustice