साेन्याचे लाॅकेट चाेरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST2021-02-21T05:07:24+5:302021-02-21T05:07:24+5:30

पवनी येथील शुक्रवारी वाॅर्डात उमाकांत काेहळे यांचे सराफा दुकान आहे. शुक्रवारी दाेन महिला त्यांच्या दुकानात आल्या. साेन्याचे लाॅकेट विकत ...

Women imprisoned for stealing Saina's locket | साेन्याचे लाॅकेट चाेरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद

साेन्याचे लाॅकेट चाेरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद

पवनी येथील शुक्रवारी वाॅर्डात उमाकांत काेहळे यांचे सराफा दुकान आहे. शुक्रवारी दाेन महिला त्यांच्या दुकानात आल्या. साेन्याचे लाॅकेट विकत घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावरून उमाकांतच्या पत्नीने त्यांना लाॅकेट दाखविणे सुरू केले. एक एक लाॅकेट बघत असताना त्या अचानक तेथून निघून गेल्या. काही वेळानंतर त्या महिलांनी साेन्याचे १.४ मिलिग्रॅम वजनाचे लाॅकेट चाेरल्याचे लक्षात आले. या लाॅकेटची किंमत २१ हजार ६०० रुपये आहे. त्यांनी आपल्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यात त्या दाेन महिला लाॅकेट चाेरत असल्याचे दिसून आले.

या प्रकाराची तक्रार उमाकांत काेहळे यांनी पवनी पाेलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी दुकानात येवून पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. आता या चाेरट्या दाेन महिलांचा शाेध पवनी पाेलीस घेत आहेत.

Web Title: Women imprisoned for stealing Saina's locket