मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 21:57 IST2026-04-17T21:56:49+5:302026-04-17T21:57:08+5:30

भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू ...

Woman killed in tiger attack while picking flowers | मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या , १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या.  दुपार उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली असता गावाजवळील जंगल शिवारात त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. 

​या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : भंडारा के पास मोह फूल इकट्ठा कर रही महिला बाघ के हमले में मारी गई

Web Summary : भंडारा के धनेगांव के पास मोह फूल इकट्ठा करते समय बाघ के हमले में एक 52 वर्षीय महिला की मौत हो गई। घर वापस न लौटने पर उसका शव वन क्षेत्र में मिला। वन अधिकारी जांच कर रहे हैं।

Web Title : Woman Collecting Moha Flowers Killed in Tiger Attack Near Bhandara

Web Summary : A 52-year-old woman was killed in a tiger attack while collecting Moha flowers near Dhanegaon, Bhandara. Her body was found in a forest area after she didn't return home. Forest officials are investigating.

टॅग्स :Tigerवाघ