शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया फंड वापराविना, महिला सुरक्षेच्या नुसत्या गप्पाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

चंदन मोटघरे लाखनी: महिला सुरक्षेचा मुद्दा आला की हे करू, ते करू, अशा गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात काम करण्याची ...

चंदन मोटघरे

लाखनी: महिला सुरक्षेचा मुद्दा आला की हे करू, ते करू, अशा गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात काम करण्याची वेळ आल्यावर कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते कमी पडते. महिलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या निर्भया फंडाच्या वापरातून ही बाब स्पष्ट झाली आहे. निर्भया फंडाअंतर्गत केंद्राकडून विविध योजना राबवण्यासाठी मिळालेल्या ८० टक्क्यांपर्यंत निधी पडून आहे. अनेक योजना राज्याने राबवल्या नाहीत.

दिल्लीत २०१२ मध्ये निर्भया प्रकरण घडले. मार्च २०१३ च्या अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष आर्थिक पॅकेज म्हणजेच निर्भया फंडाची घोषणा झाली. ही रक्कम केंद्राकडून राज्याला मिळते. याअंतर्गत काही योजना केंद्राच्या तर काही योजना राज्य राबवते. महाराष्ट्रासह अनेक राज्य त्याचा वापर करण्यात कमी पडल्याचे लोकसभेत सादर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. निर्भया फंडाअंतर्गत आजवर ९२,८८.४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी ५,७१२.८५ कोटी रुपये वितरित केले. ३,५४४.०६ कोटी रुपये वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

न्याय आणि विधी विभाग विभागातर्फे बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या सुनावणीसाठी २१०८-१९ पासून फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यासाठी निधी दिला जात आहे. राज्याला २०१९-२० मध्ये ३,१०५ लाख रुपये मिळाले. तो न खर्चल्याने २०२०-२१ मध्ये निधी दिला नाही. महिलांना मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करण्याकरिता राज्याला २०१५-१६ मध्ये ६२.७० लाख रुपये मिळाले. हा शंभर टक्के निधी पडून असल्याने २०१६ ते २०२१ दरम्यान नवीन निधी मिळाला नाही. गृह मंत्रालयाने निर्भया फंड अंतर्गत महाराष्ट्राला २०१६-१७ मध्ये १,७६५ लाख, २०१७-१८ मध्ये १,७४३ लाख, २०१८-१९ मध्ये ११,४३२ लाख तर २०१९-२० मध्ये ९,४६४ लाख रुपये दिले. पाच वर्षात २५ हजार ४०४ लाख रुप यांचा निधी मिळूनही त्यापैकी १७,८३४ लाख रुपयांचा विनियोग झाला. तर ७० टक्के निधी शिल्लक राहिला. २०२०-२१ मध्ये निधी मिळाला नाही. निर्भया फंडाअंतर्गत संकटकाळी मदत प्रणालीसाठी १,२८५ लाख, बलात्कारपीडित आर्थिक मदतीसाठी १,७६५ लाख, सायबर गुन्हे थांबवण्यासाठी ४५८ लाख, राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी ५३७० लाख, महिला हेल्पडेक्ससाठी ७०० लाख, महिलांची तस्करी रोखण्यासाठी ४६२ लाख तर सुरक्षित सर योजनेसाठी १४,३६४ लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. मात्र, याच्या विनियोगाचा तपशील उपलब्ध नाही.

बॉक्स

वन स्टॉपचा ८३ टक्के निधी शिल्लक

महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत वन स्टॉप सेंटर चालवले जाते. यासाठी महाराष्ट्राला २०१५-१६ मध्ये ४५.८८ लाख, २०१६-१७ मध्ये २१३.५६ लाख, २०१७-१८ मध्ये ४३७.७० लाख, २०१८-१९ मध्ये ३८९.२९ लाख, २०१९-२० मध्ये ६६९.९९ लाख, तर २०२०-२१ मध्ये २६५.०८ लाख रुपये वितरित करण्यात आले. सहा वर्षात फक्त २३२.८० लाख रुपयांचा वापर झाला.

बॉक्स

राज्यात विशेष योजना नाही

गृह खात्याच्या महिला पोलीस स्वयंसेवक योजनेत १३ राज्य आहेत. मध्य प्रदेश, नागालँड, राजस्थान व उत्तराखंडने महिला हिंसामुक्त स्मार्ट शहर, निर्भया आश्रयगृह, महिला सशक्तीकरण संचालनालय योजना राबवल्या. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय अंतर्गत आंध्र प्रदेश, कर्नाटक व उत्तर प्रदेशने कन्या वाहतूक योजना, चालक योजना, सार्वजनिक वाहतुकीत महिला सुरक्षा वाहन ट्रेकिंगसारख्या योजना राबविल्या. महाराष्ट्रात कोणतीही योजना सुरू नाही.