शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भंडारातील बाजार चौकात दारू विक्रीला अभय कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

शहरात ठिकठिकाणी अवैधपणे दारू विक्रीला उधाण आले आहे. कोरोना काळात त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला होता. मात्र अनलॉक प्रक्रियेंतर्गत हळूहळू बाजारपेठेची वेळ वाढली आहे. विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या परिसरात खुलेआमपणे दारूची विक्री होत असते. चक्क ठेल्यावर दारूचा प्याला मांडून मद्यपी बोलत असतात. यावर वचक म्हणून काही महिन्यांपुर्वी येथे पोलिसांची राहूटी उभारून गस्त लावण्यात आली होती.

ठळक मुद्देभीतीपोटी सर्वच मूग गिळून, सायंकाळनंतर असतो मद्यपिंचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात दारू विक्रीसह अवैध व्यवसाय सुरू आहेत, हे सांगितले तर नवीन बाब नाही. परंतु पोलिसांसमक्ष भर चौकात दारू विक्री होत असल्यास कायदा व सुव्यवस्थेची अवस्था काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. भंडारा शहरातील मोठा बाजार चौक परिसरात ही स्थिती दिसून येत असून दारू विक्रीला अभय कुणाचे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.शहरात ठिकठिकाणी अवैधपणे दारू विक्रीला उधाण आले आहे. कोरोना काळात त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला होता. मात्र अनलॉक प्रक्रियेंतर्गत हळूहळू बाजारपेठेची वेळ वाढली आहे. विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या परिसरात खुलेआमपणे दारूची विक्री होत असते. चक्क ठेल्यावर दारूचा प्याला मांडून मद्यपी बोलत असतात. यावर वचक म्हणून काही महिन्यांपुर्वी येथे पोलिसांची राहूटी उभारून गस्त लावण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही राहुटीच तेथून हटविण्यात आली. आता तिच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. दबंगशाहीपणा व मुजोरी करून हा सर्व प्रकार सुरू आहे. याचा सर्वात जास्त फटका येथील सामाजिक वातावरणात दिसून येत आहे. सायंकाळनंतर जणू काही मद्यपींची जत्राच भरलेली दिसून येते. महिला व तरूणी या रस्त्याने जाण्यास धजावत असतात. मुकाटपणे तोंड दाबून तिथून जाण्याशिवाय पर्याय नसतो. उल्लेखनीय म्हणजे आम्ही पोलिसांना हप्ते देत असल्यामुळे कुणी आमचे बिघडवू शकत नाही, असे बोलून दाखविले जात असल्याने कारवाई काय होणार यावर शंका व्यक्त केली जात आहे. असाच प्रकार शहरातील अन्य भागातही सुरू असून संबंधित बीटनिहाय कर्मचारी मालामाल होत असल्याचेही बोलल्या जाते.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. जिल्हा पोलीस दलात नव्याने आलेले सेनापती म्हणजेच जिल्हा पोलीस अधीक्षकांवर अवैध व्यवसायावर आळा घालण्याची मोठी जबाबदारी आहे. तसा हा जिल्हा नवीन सेनापतींसाठी जुनाच आहे. त्यामुळे अवैधपणे सुरू असलेल्या धंद्यावर वचक घालणे कठीण जाणार नाही. पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्कही जबरदस्त असल्याने तंतोतंत माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. कुठे दारू व कुठे गांजा विकला जातो. याची माहिती असताना कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी