शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात भारनियमनाचा फटका

By admin | Updated: February 9, 2015 23:08 IST

करडी परिसरात विद्युत विभागाच्या भारनियमनाचा फटका सर्वत्र बसत आहे. परिसरात ११ तासाचे भारनियमन होत असल्याने शेतातील पिक वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

करडी (पालोरा) : करडी परिसरात विद्युत विभागाच्या भारनियमनाचा फटका सर्वत्र बसत आहे. परिसरात ११ तासाचे भारनियमन होत असल्याने शेतातील पिक वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वैनगंगा शुगर कारखाना व व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. एकंदर नुकसानीचे सत्र सुरु आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थती घोषित झालेली असतांना शासन वेठीस धरत आहे. त्वरित भारनियमन बंद करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.करडी परिसर मागासलेले क्षेत्र म्हणून ओळखले जाते. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून परिसरात गुळ घाणी, पिठ गिरण्या, धानपिसाई मिल, वेल्डींग व्यवसाय आदी अन्य व्यवसाय केले जात आहेत. परिसरात वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर तसेच ऐलोरा पेपर मिल सारखे मध्यम स्वरुपाचे उद्योगही आहेत. सर्वत्र सुरळीत असतांना अचानक शासन व विद्युत विभागाने परिसराला भारनियमनाचा शॉक दिला आहे. एक दोन तासाचे नव्हे तर तब्बल ११ तासाचे भारनियमन केले जात असल्याने परिसराची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतातील रब्बी पिके, ऊस व भाजीपाला पिके करपू लागली असून व्यावसायीकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. रात्रीच्या वेळी रात्रीचे प्रमाण वाढले आहेत. वैनगंगा कारखान्याचे पेट्रोल, डिझेल पंप व बोरगाव येथील पंपसुध्दा बंद राहू लागल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. नागरिक विज बिलाचा भरणा वेळेवर करित असतांना क्षेत्राला ‘इ’ ग्रुप भारनियमनाच्या श्रेणीत टाकण्यात आले असून शासन क्षेत्राचे आमदार, खासदार मुकदर्शक बनले आहेत.