लग्न वऱ्हाड्यांची कार उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:01:08+5:30

तालुक्यातील येरली येथील एका मुलाचे मध्यप्रदेशात असलेल्या एका गावातील मुलीशी लग्न होते. वऱ्हाडी मंडळी खाजगी कारने समारंभासाठी गेले होते. दरम्यान परत येत असताना कार (क्रमांक एमएच ४९ एई ६३०४) ही मध्यप्रदेशातील खैरलांजीनजीकच्या सालेटोक वळणावर उलटली. चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहनाला अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

The wedding car overturned | लग्न वऱ्हाड्यांची कार उलटली

लग्न वऱ्हाड्यांची कार उलटली

ठळक मुद्देचालकासह दोन गंभीर : येरली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लग्न आटोपून परत येत असलेल्या वºहाड्यांची कार उलटल्याने चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या घडली. प्रकाश रहांगडाले (३०), दिनेश रहांगडाले (२५) व चालक सुशिल पारधी (२५) तिघेही रा. येरली असे गंभीर झालेल्या तिघांची नावे आहेत.
तालुक्यातील येरली येथील एका मुलाचे मध्यप्रदेशात असलेल्या एका गावातील मुलीशी लग्न होते. वऱ्हाडी मंडळी खाजगी कारने समारंभासाठी गेले होते. दरम्यान परत येत असताना कार (क्रमांक एमएच ४९ एई ६३०४) ही मध्यप्रदेशातील खैरलांजीनजीकच्या सालेटोक वळणावर उलटली. चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहनाला अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
सदर चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने गाडीचा चुऱ्हाडा झाला.
या घटनेत तिघेही जण गंभीर जखमी झाले. तिघांनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: The wedding car overturned

टॅग्स :Accidentअपघात