शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीचा पाणीपुरवठा होणार बंद

By admin | Updated: January 11, 2016 00:21 IST

सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे.

जलकुंभाची साठवण क्षमता कालबाह्य : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पत्रसंजय साठवणे साकोलीसेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे साकोली व सेंदुरवाफा येथे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. येत्या १५ जानेवारीपासून साकोलीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी नगर पंचायत साकोलीला दिले आहे. त्यामुळे साकोलीवासियांच्या समस्येत भर पडणार आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग साकोलीतर्फे साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावाना पाणी पुरवठा करण्यात येत होता. यासाठी एम. बी. पटेल महाविद्यालय साकोलीच्या मागे असलेल्या टेकडीवर पाण्याचे जलकुंभ तयार करण्यात आले होते. उर्वरित साकोली येथील काही वार्डासाठी लाखांदूर मार्गावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बाजुलाच एक पाण्याचे जलकुंभ आहे. या दोन्ही टाकीतुन साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र सात-आठ वर्षाआधी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. या कामादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सेंदुरवाफा येथे जाणारी पाईपलाईन निकामी झाली तेव्हापासुन सेंदुरवाफा येथील पाणीपुरवठा बंद आहे.साकोली येथील कॉलेजच्या मागील बाजुला असलेली पाईपलाईन ठिकठिकाणी बुझल्यामुळे व लोकांची घरे झाल्यामुळे बरीच पाईप लाईन निकामी झाली परिणामी टेकडीवरील टाकीत पाणी आणावे बंद झाले त्यामुळे साकोली येथील फक्त तलाव व गणेशवॉर्ड या दोन वॉर्डातील पाणीपुरवठा या विभागामार्फत सुरु होता. मात्र सदर योजनेची पाईप लाईन व पाण्याची टाकी जीर्ण झाली त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने ३० आॅक्टोंबर २०१५ रोजी डॉ. एस. एस. कुलकर्णी (नागपुर) यांनी साकोली सेंदुरवाफा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत या जलकुंभाचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणानुसार सदर जलकुंभाला ४० वर्ष पुर्ण झाली असून टाकीला ‘लिकेजेस’ असल्याचे पाहणीनंतर दिसून आले. त्यामुळे सदर टाकी वापरण्यात येऊ नये व जलकुंभ लवकरात लवकर जमीनदोस्त करण्यात यावे असे सुचविले आहे. या अहवालावरुन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी येत्या १५ तारखेपासुन साकोलीचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. या आशयाचे पत्र नगर पंचायत प्रशासक साकोली यांना दिले व पुढे पाण्याची सोय करावयाची असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचेशी संपर्क साधावे असेही नमुद करण्यात आले आहे.त्यामुळे ऐन मकर संक्रातीला सणासुदीच्या दिवसातच साकोलीचा पाणी पुरवठा बंद होणार असल्याने सणाच्या आनंदोत्सवात विजण पडेल यात शंका नाही.