शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा खर्च सिंचनासाठी व्यर्थ

By admin | Updated: February 8, 2016 00:34 IST

गत ३० वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत.

रबी हंगामात अडचण : साकोली तालुक्यातील व्यथासाकोली : गत ३० वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत. आतापर्यंत निम्म चूलबंद प्रकल्पाचे काम जवळपास पुर्णत्वास आले असले तरी ते व्यर्थ ठरत आहे. रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रकल्पाला अजून किती दिवस लागतील, या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा विहिरी, बोड्या व तलावाकडेच वळावे लागत आहे.गत २० वर्षापासून तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम अपुर्ण आहे. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याच्या शेतीचा मोबदला मिळालाच नाही. प्रकल्पाच्या पंपहाऊसचे कामासह इतर काम अपूर्ण आहे. या प्रकल्पावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला असला तरी हे काम अद्यापही रखडलेले आहे. या प्रकल्पाची पाहणी तत्कालीन सिंचनमंत्री यांनी केली. मात्र हा प्रकल्प तालुकावासीयांसाठी पांढरा हत्तीच ठरला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.तालुक्यातील दुसरा महत्वाचा प्रकल्प भिमलकसा याची वनकायद्यातून तब्बल ३० वर्षानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुटका केली. यानंतर या प्रकल्पासाठी राजकीय वर्तुळातून मोठ्या हालचाली झाल्या. प्रकल्पाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली मात्र केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प अडला आहे. याही प्रकल्पाचे ९० टक्के काम पुर्ण झाले असुन प्रकल्पावर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. तर तालुक्यातील तिसरा महत्वपूर्ण प्रकल्प घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प सद्यास्थितीला या प्रकल्पाकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही हे मात्र विशेष. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे लक्षसाकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा दोन्ही सिंचनप्रकल्पाकडे पल्लवित झाला होत्या. शेतकऱ्यांना हरीत क्रांतीची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमेल तसे शेतीतुन उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आज अशी परिस्थिती आहे की खरीप पिकानंतर शेती पुर्णत: खाली पडली असून पाण्याअभावी शेतकरी रब्बी पिक घेऊच शकत नाही अशी विदारक अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा खर्च सिंचनासाठी व्यर्थ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.