शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी ..

पालोरा (चौ.) : पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला मागे टाकून सागवन जळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. यात एक हजार जळीमागे एका मजुराला १५० रुपये मिळत आहेत. एका दिवशी एक मजूर ७ ते ८ हजार जळी काढतो. त्यामागे त्याला ८ ते ९ रुपये मिळत असल्यामुळे ही सागवन जळी मजुरांसाठी वरदान ठरत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे मजुरांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.धान्याचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिद्ध आहे. वर्षातून तीन वेळा शेतातून उत्पन्न घेतले जाते. पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात घेतले जाते. मात्र धान पिकाला लागणारी जास्त प्रमाणात मेहनत, वाढता खर्च, पिकाला अल्प भाव मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झालेला होता. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला मागे टाकून उसाचे उत्पादन घेणे सुरु केले आहे. मात्र वाढत्या महागाईने मिळणाऱ्या मजुरीने मजुरांना आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाले होते. येथील डॉ.अमन भांडारकर यांनी मागील दहा वर्षापूर्वी आपल्या शेतात सागवन जळीचे पिक घेतले होते. या पिकामुळे खर्च कमी उत्पादन जास्त लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी जळीचे पिक घेणे सुरु केले. आज जवळपास शेकडो एकर शेतीमध्ये सागवन जळीचे उत्पादन घेणे सुरु आहे. यात शेतकऱ्यांसोबतच मजुरांना चांगलाच रोजगार मिळाला आहे. गावातील बऱ्याच प्रमाणातील मजूर वर्ग सागवन जळी खोदण्याच्या कामावर जात आहेत. या कामात मजूरी चांगल्या प्रमाणे मिळत असल्यामुळे मजूर वर्ग शेतकऱ्यांचा शेतात काम करण्यास जायला कंटाळत आहेत. कुटुंबाला काम मिळत असल्यामुळे गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. मात्र मजूर वर्गात आनंद पाहायला मिळत आहे. दोन महिन्यात एक कुटुंब २० ते ३० हजार रुपयाचे काम करतो. अल्प मेहनत जास्त पैसे मिळत असल्यामुळे मजुरांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. (वार्ताहर)