शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३३ अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२११ पैकी १७८ नमुने निगेटिव्ह : हॉस्पिटल क्वारंटाईनमधून ११० व्यक्तींना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत पाठविलेल्या २११ नमुन्यांपैकी १७८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३ अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. हॉस्पिटल क्वारंटाईनमधून ११० व्यक्तींना तर आयसोलेशन वॉर्डातून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४७ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ३५ व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. तर १२ व्यक्तींचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १८ व्यक्ती दाखल असून आतापर्यंत येथून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे तर नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात २७ व्यक्ती दाखल असून तेथून ११० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. १ मार्च ते २० एप्रिल दरम्यान महानगर व परराज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या २२ हजार ३९५ झाली आहे. यापैकी दहा हजार ८८२ व्यक्तींचा होमक्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. ११ हजार ५७३ व्यक्ती गृहविलगीकरण कक्षात दाखल आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव भंडारा जिल्ह्यात होवू नये, जिल्हा कोरोनामुक्त रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जीवनावश्यक व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या