शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचे उल्लंघन

By admin | Updated: September 26, 2016 00:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे.

गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : मानसिकता बदलण्याची गरजभंडारा : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे. प्लॉस्टिकच्या वापरामुळे जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत मात्र नगरपालिकेतर्फे ठोस दंडात्मक कार्यवाही होत नसल्यामुळे शहरात प्लस्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वत्र आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणाऱ्या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे. यामध्ये सांडपाणी निचरा करणाऱ्या व्यवस्थेत अडथळे निर्माण होणे, भूगर्भजल प्रदूषित होणे, असे अनेक धोके समाविष्ट आहेत. शिवाय या प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे जनावरांवर मृत्यू ओढावत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच उकीरड्यावर प्लास्टिक बॅग पडलेल्या आढळून येतात. यामुळे पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपालिका प्रशासन ठोस कार्यवाही करीत नसून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी) अशी आहे कारवाईची तरतूद प्लास्टिक निबंर्धाबाबत पर्यावरण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार, तयार केलेल्या पर्यावरण संरक्षण नियम ४ नुसार ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे उत्पादन करणे, ते आयात करणे वा त्याचा पुरवठा करणे तसेच विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे; परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उदासीन असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही.ग्रामीण व्यावसायिकांकडून दुर्लक्ष भंडारा शहरातील व्यावसायिकांना ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापर करुन नका, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. या आवाहनाला शहरातील व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र ग्रामीण भागातील बरेच लघू व्यावसायिक शहरात व्यवसाय करताना त्यांकडून प्लास्टिक बंदीकडे दुर्लक्ष होत आहे. पथके नाहीत४महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिकवरील बंदीची अंमलबजावणी कठोरपणे होण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा नगरपालिकेला विशेष पथक गठित करण्याचे आदेश दिले होते. प्लास्टिक बंदीला कोलदांडा घालणाऱ्यावर सदर पथके दंडात्मक कारवाई करणार होते; परंतु पालिकेने सदर पथके गठित केली नाहीत.