शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी करा विदर्भ राज्याचा निर्धार

By admin | Updated: July 28, 2014 23:21 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय

विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतीदिनी ‘बस देखो - रेल देखो’ आंदोलनभंडारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याची हीच संधी असून आता हातून जाऊ द्यायची नाही, असा निर्धार स्थानिक सार्वजनिक वाचनालयात झालेल्या सभेत घेण्यात आला.या सभेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोरे, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा.शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, अ‍ॅड. गोविंद भांडारकर समन्वयक अ‍ॅड. कांचन कोतवाल, सुरेश ब्राम्हणकर, अशोक पारधी यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सभेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भावर शपथ घेतली. तसेच ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून विदर्भात बस देखो रेल देखो च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याच्या निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाशाला विदर्भ बंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे.प्रमुख मार्गदर्शक चंदक्रांत वानखेडे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवणेश्वर येथे वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला आता केंद्रात भाजपेच सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही. मात्र सत्ता येताच भाजपाचा सुर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल, सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे मग पुढील निवडणुक त्या आधारे जिंकायची हा राजकीय डाव आहे तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपुर्वीच शक्य आहे. प्रास्ताविक सुरे बाम्हणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. कांचन कोतवाल यांनी केले तर आभार अशोक पारधी यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)