विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:14+5:302021-09-16T04:44:14+5:30

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना जुनी ...

Vidarbha Secondary Teachers Association Teachers Meet | विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, प्रचलित धोरणानुसार अनुदान, वरिष्ठ / निवड श्रेणी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, प्रलंबित महागाई भत्ता, अनियमित वेतन, वेतनेत्तर अनुदान,१९०१ अंतर्गत अनियमित होणारे वेतन, अंशतः अनुदानित शाळेत अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकाचे समायोजन, इत्यादी विषयावर विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले.

संचालन कामडी यांनी तर प्रास्ताविक भानारकर यांनी केले. उपस्थितांचे आभार ढोरे यांनी मानले. या तालुकास्तरीय शिक्षक मेळाव्याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. खांगर, विजुक्ताचे रोडे उपस्थित होते. मुख्याध्यापक वर्ग तसेच शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मेळाव्यासाठी मेहरकुरे, मिलमिले, शालिक ढोरे, भानारकर, निखाडे, मुरलीधर कामडी वार्धेलवर, महेश चौधरी तथा सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Vidarbha Secondary Teachers Association Teachers Meet