शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रिफ्लेक्टरविना धावताहेत वाहने

By admin | Updated: October 30, 2014 22:46 IST

वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७0 ते ८0 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे.

भंडारा : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७0 ते ८0 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. हे अपघात टाळता येणे शक्य आहे. असे असतानाही वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून या मार्गावर अनेक वाहने विनारिफ्लेक्टर धावतात. यावर कारवाईची मागणी होत आहे.शहरात चौकाचौकात उभे राहणारे पोलीसही या छोट्या-छोटया परंतु महत्त्वाच्या गोंष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात वाढच होत आहे. शहरातील रस्त्यांवर व महामार्गावर अनेक जड वाहनांना पुढचे किंवा मागचे दिवे नसतात. मागे परावर्तक (रिफ्लेक्टर) नसतात. काहींच्या वाहनातील लोखंडी सळ्या किंवा वाहनातील अवजड यंत्राचा लांबुळका भाग बाहेर आलेला असतो आणि तो रात्री अगदी जवळ आल्याशिवाय मागच्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. नियमानुसार वाहनाच्या दोन्ही बाजूंनी किंवा मोठे वाहन असल्यास चारही बाजूंनी रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी लावणे अत्यावश्यक आहे. पण प्रत्येक टप्प्यावर समांतर पोलीस व्यवस्थेचा खासगी कर भरल्यामुळे अशा वाहनांना कुणीच अडवत नाही. याउलट दिवसा चौकाचौकात आणि महामार्गावर उभे राहणारे पोलिसही याकडे विशेष लक्ष देत नाही. यामुळे टेललॅम्प बंद असलेल्या व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना मागील बाजूने दुसऱ्या वाहनांने धडक देण्याच्या घटना वाढतच आहे. तज्ज्ञाच्या मते, जकात नाक्यावर किंवा शहरात चौररस्त्यावर वाहन थांबते, तेव्हा टेललॅम्प किंवा रिफ्लेक्टरची तपासणी करायची व ते बंद असतील तर तातडीने दंड आकारून ते सुरू करुन देण्याची व बसविण्याची मोहीम राबविणे आवश्यक आहे, मात्र संबंधित विभाग याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा पंधरवड्यातच वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह करतात. या दिवसांत रेडियम पट्टी लावण्याची मोहिमही राबविली जाते. ज्या वाहनांना ही पट्टी किंवा रिफ्लेक्टर नसतात अशा वाहनांना थांबवून ते लावतात. परंतु त्याचवेळी त्या वाहनांवर कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे हा पंधरवाडा आटोपताच हे दोन्ही, विभाग महसूल गोळा करण्यात व्यस्त होतात. यामुळे वाहनचालकांनी जबाबदारी म्हणून स्वत:हूनच याची दक्षता घेण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)