फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:01:08+5:30

नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले.

The vehicle of the mobile medical team overturned | फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

ठळक मुद्देबिनाखीची घटना : सहा जण सुदैवाने बचावले, वैद्यकीय तपासणीसाठी जात होते पथक

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटल्याची घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. या वाहनातील सहा जण थोडक्यात बचावले.
नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले. मात्र वाहन अनियंत्रित होवून एका झाडाला धडक दिली आणि रस्त्यालगतच्या तलावाच्या तीरावर उलटली. मोठा अपघात होवूनही या वाहनात असलेल्या सहाही जणांना कोणतीही दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत केली. सदर वाहन भंडारा येथील असून गावागावात जावून नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तुमसर येथे नेण्यात आले.

Web Title: The vehicle of the mobile medical team overturned

टॅग्स :Accidentअपघात