शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामावर नदीपात्रातील दगडांचा उपयोग

By admin | Updated: September 14, 2014 23:53 IST

सुकळी (दे) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. रस्ता खडीकरणाच्या कामासाठी वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून वापरण्यात येत आहे. ठिकठिकाणी या दगडांचे ढिग पडले आहेत.

२२ लक्ष निधीचा रस्ता : खनिकर्म, महसूल प्रशासन गप्प, १११ ट्रॅक्टर दगडांचा केला पंचनामातुमसर : सुकळी (दे) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. रस्ता खडीकरणाच्या कामासाठी वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून वापरण्यात येत आहे. ठिकठिकाणी या दगडांचे ढिग पडले आहेत. २२ लक्ष रूपयांच्या रस्ता बांधकामावर नदीपात्रातील दगडांची वाहतुक करून कामे करण्यात येत आहे. येथे गैरव्यवहार, नियमबाह्य काम व दगडांची उचल करणे सुरु आहे. यासंबंधी चार ग्रामपंचायत सदस्यांनी प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, खनिकर्म अधिकारी तथा तहसीलदारांकडे केली. परंतु अजूनपर्यंत चौकशी झाली नाही. सरपंच व ग्राम पंचायत सचिवावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेंतर्गत सुकळी (दे.) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि.मी. चा रस्ता सुकळी ग्रामपंचायतीमार्फत करणे सुरु आहे. २२ लाखाचा निधी येथे मंजूर झाला आहे. दोन टप्प्यात खडीकरणाचे काम करण्यात येत आहे. या रस्त्यावर वैनगंगा नदी पात्रातील मोठे दगड जमा करून (मजुरांकडून) रस्ता कामावर त्याचा सर्रास वापर करणे सुरु आहे. नदीपात्रात मजूर हे दगड गोळा करतात मोठ्या दगडांना उचलून ट्रॅक्टरमध्ये भरले जाते व नंतर रस्त्याच्या शेजारी त्यांचा ढिग टाकला जात आहे. मोठ्या दगडांना रस्त्यावर फोडून त्यांचे ४० ते ८० एम.म. दगड तयार केले जात आहे .जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून हा निधी येथे प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य विकास ठवकर, अनिल बुद्धे, गीता चौधरी, नलू चौधरी, रविंद्र सार्वे, राधेश्याम डोळस व इतर ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. दोन दिवसापूर्वी मंडळ अधिकारी क्षीरसागर आले होते. त्यांनी पंचनामा केला. १११ ट्रॅक्टर दगड रस्त्यावर पडून असल्याचे नमूद केले आहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाला नाही. सुमारे १५ ते २० दिवसापासून नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी ढीग तयार केला जात आहे. परंतु स्थानिक तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. या संदर्भात पाच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता योगेश्वर प्रेमलाल बुराडे (२३) यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती विचारणार असल्याचे कळल्यावर सरपंच भाऊलाल बांडेबुचे यांनी बुराडे यांना रात्रीच्या सुमारास गावातील चौकात मारहाण केली होती. या संदर्भात बुराडे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात बांडेबुचे याची तक्रार केली होती. परंतु मोहाडी पोलिसांनी सरपंच बांडेबुचे यांचे बयान घेतले नाही असा आरोप केला आहे.तुमसर मुख्यालयापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर सुकळी गाव आहे. जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, तहसीलदारांचे येथे लक्ष का गेले नाही असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. सरपंच व सचिवावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)