शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांसह तणनाशकांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बारव्हा : पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे तर मजुरांच्या टंचाईने शेतकऱ्यांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बारव्हा : पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे तर मजुरांच्या टंचाईने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तणनाशकाचा वापर करावा लागत आहे. शेतीचा पोत घसरत असला तरी याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात शेतकरी रासायनिक खतांसह तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच जोडधंदा म्हणून गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरे पाळत होते. त्यातून मिळणारे शेणखत शेतीसाठी उपयोगी पडत होते. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. या तत्त्वांमुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. शिवाय शेतीचा पोतही वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे, त्यामुळे जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.

बाॅक्स

हिरवळीच्या खतांबाबत जागृतीचा अभाव

जमिनीचा पाेत कायम राखण्यासाठी जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी पैशांची जमवाजमव करून रासायनिक खतांचाच वापर करतात. त्यामुळे जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे.

बाॅक्स

सिंचनाअभावी चार महिने शेती पडीक

शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी पिके घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी, बोअरवेलची व्यवस्था आहे, ते भाजीपाल्याची लागवड करतात; परंतु जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यातील शेती पडीक राहते. शेतकरी कामाच्या शोधात बाहेरील जिल्ह्यात वा अन्य राज्यात जात असल्याने शेतीचा पुरेपूर वापर हाेत नाही. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे, त्यामुळे जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करुन उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत घसरला आहे.