शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात शेतीच्या वादात काकाने केला पुतण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 20:14 IST

Bhandara news murder शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादात काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रामपूर (मांढेसर) येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली.

ठळक मुद्देरामपूर(मांढेसर)ची घटनासात जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा: शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादात काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रामपूर (मांढेसर) येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. काठीने जोरदार प्रहार केल्याने पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी काकासह सात जणांना अटक केली आहे.

रवींद्र श्यामराव सव्वालाखे (३८) रा. रामपूर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे (५५), बाबुलाल उपासू सव्वालाखे (५३), गेंदलाल जलकन सव्वालाखे (३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे (२३), बळीराम बाबुलाल सव्वालाखे (२१), विनोद जलकन सव्वालाखे (३५) सर्व रा. रामपूर (मांढेसर), अशी आरोपींची नावे आहेत. मांढेसर येथील सव्वालाखे कुटुंबात शेतीची हिस्सेवाटणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु झालेल्या वाटणीवरून कुटुंबात धुसफूस सुरू होती. त्यातच जागेचा वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता रवींद्र सव्वालाखे आपल्या शेतात गेला होता. त्यावेळी याच कारणावरून वाद झाला. या वादात सात जण हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले. त्यांनी रवींद्रच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. भांडणाचा आवाज ऐकून रवींद्रचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला. त्यावेळी त्याच्या मागेही हातात काठ्या व तलवार घेऊन मारायला धावले. त्यात तो किरकोळ जखमी झाला. जीव वाचवून तेथून पळून गेला.

या घटनेची माहिती गावात होताच एकच खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार राहुल देशपांडे, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस हवालदार सोमेश्वर सेलोकर, मिथून चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवेंद्र सव्वालाखे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०२, ३२४, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, भारतीय हत्यार कायदा कलम चार, २५ नुसार गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासातच सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी