कोरोनाच्या संकटात दोन युवा डॉक्टरांची रुग्णसेवेसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:49+5:30

शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शेंडे व डॉ. घोडेस्वार वैद्यकीय अधिकारी म्हणून दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने येतात. सध्या सर्वत्र कोरोनाची धास्ती आहे. सध्या शासकीय रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुग्ण तपासणीसाठी येतात. हे दोन्ही डॉक्टर सलग सात ते आठ तास कर्तव्य बजावून रुग्णांच्या मनातील भीती दूर करतात.

Two young doctors clash in Corona crisis | कोरोनाच्या संकटात दोन युवा डॉक्टरांची रुग्णसेवेसाठी धडपड

कोरोनाच्या संकटात दोन युवा डॉक्टरांची रुग्णसेवेसाठी धडपड

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटातील देवदूत : तुमसर उपजिल्हा रुग्णालय

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोनाच्या महासंकटात रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर म्हणजे आधुनिक देवदूत. शारीरिक व्याधीसोबत मानसीक आधार देण्याचेही काम अनेक डॉक्टर करीत आहे. यातील दोन तरुण डॉक्टर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात आपली निरंतर सेवा देत आहेत. डॉ. अविनाश शेंडे व डॉ. संदिप घोडेस्वार अशी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शेंडे व डॉ. घोडेस्वार वैद्यकीय अधिकारी म्हणून दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने येतात. सध्या सर्वत्र कोरोनाची धास्ती आहे. सध्या शासकीय रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुग्ण तपासणीसाठी येतात. हे दोन्ही डॉक्टर सलग सात ते आठ तास कर्तव्य बजावून रुग्णांच्या मनातील भीती दूर करतात.
कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना २४ तासाचा अलर्ट दिला होता. या दोन्ही डॉक्टरांनी आपली निरंतर सेवा सुरु ठेवली. नागरिकांनी घाबरुन न जाता थेट शासकीय रुग्णालयात यावे असे आवाहन करतात. डॉ. शेंडे यांनी धूळे येथून एमबीबीएस केले असून ते मुळचे तुमसर येथील आहे. डॉ. घोडेस्वार यांनी कोल्हापूर येथून एमबीबीएस केले असून तेही तालुक्यातील येरली येथील आहे. तालुक्यातील युवा डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे.

नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता कोणतेही लक्षण आढळल्यास थेट रुग्णालयात यावे, सॅनिटायझरचा अधिकाधिक वापर करावा, शासकीय नियमांचे पालन करावे.
- डॉ. अविनाश शेंडे

कोरोना विषाणूला घाबरण्याचे कारण नसून स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, बाहेर शक्यतो जावू नये, बाहेर निघाल्यास मास्क लावूनच जावे. प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर द्यावा.
- डॉ. संदीप घोडेस्वार

Web Title: Two young doctors clash in Corona crisis